बाजारात पत्नीला मारहाण करत होता पती; लोकांनी घडवली चांगलीच अद्दल, त्याचीच केली धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 02:26 PM2023-01-28T14:26:34+5:302023-01-28T14:28:09+5:30

महिलेला मारहाण करणाऱ्याला लोकांनी धडा शिकवला. त्याचीच भर रस्त्यात धुलाई केली. 

ratlam young man was beating his wife in the market mob thrashed husband | बाजारात पत्नीला मारहाण करत होता पती; लोकांनी घडवली चांगलीच अद्दल, त्याचीच केली धुलाई

फोटो - news18 hindi

googlenewsNext

पती-पत्नीचा वादामुळे रतलाममध्ये खळबळ उडाली आहे. एक जण बाजारपेठेत आपल्या पत्नीला बेदम मारहाण करत होता. ही मारहाण एवढी भयंकर होती की, पाहणाऱ्यांनाही त्रास होत होता. शेवटी उपस्थित असलेल्या लोकांनी पतीलाच चांगली अद्दल घडवली. महिलेला मारहाण करणाऱ्याला लोकांनी धडा शिकवला. त्याचीच भर रस्त्यात धुलाई केली. 

रतलामच्या कॉलेज रोड परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे. इमरान नावाचा व्यक्ती पत्नीला सर्वांसमोर खूप मारहाण करत होता. तो थांबत नव्हता. पत्नी आरडाओरडा करत होती. त्याच्यापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पण नवरा मारतच होता. बाजारात उभे असलेले लोक ही क्रूरता पाहत होते. त्यानंतर जमावाने पत्नीला त्याच्या तावडीतून वाचवले.

पती-पत्नीमध्ये जुना वाद

इमरान आणि त्याच्या पत्नीमध्ये पूर्वीपासून वाद सुरू आहे. प्रकरण न्यायालयात आहे. यावरून भांडण सुरू होते, ते रस्त्यापर्यंत पोहोचले. रस्त्यावरील गोंधळ पाहून आजूबाजूला बघ्यांची गर्दी झाली. महिलेला मारहाण होत असल्याचे पाहून लोक संतापले आणि त्यांनी आरोपी पतीला धडा शिकवला. त्याला मारहाण केली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून आरोपी पतीने पळून जाण्यातच आपले हित आहे असे मानले.

आरोपी पतीचे नाव इमरानचे वडील भय्यू खान असून तो उज्जैन जिल्ह्यातील रुनिजा गावचा रहिवासी आहे. दुपारी कॉलेजरोड परिसरातून जात असताना त्याला पत्नी रस्त्यावरून जाताना दिसली. महिलेच्या चेहऱ्यावर स्कार्फही बांधला होता. पत्नीला एकटीला पाहून आरोपीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तो तिला बेदम मारत होता. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोकही घटनास्थळी जमा झाले. लोकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी इमरानला बेदम मारहाण केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: ratlam young man was beating his wife in the market mob thrashed husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.