अश्लिल मॅसेज पाठवून रेशन दुकानदार महिलेचा पुरवठा निरीक्षकाकडून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 21:02 IST2020-12-15T21:00:15+5:302020-12-15T21:02:59+5:30
Molestation : कुरखेडातील अधिकारी : अश्लिल मॅसेज पाठवून दिला त्रास

अश्लिल मॅसेज पाठवून रेशन दुकानदार महिलेचा पुरवठा निरीक्षकाकडून विनयभंग
कुरखेडा (गडचिरोली) : तालुक्यातील एका महिला रेशन दुकानदाराला मोबाईलवर सातत्याने अश्लिल मॅसेज पाठवून विनयभंग करणाऱ्या कुरखेडा येथील अन्न पुरवठा निरीक्षकाविराेधात कुरखेडा पाेलीस स्टेशनमध्ये मंगळवारी (दि.१५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमाकांत वालदे (४६) असे त्या आरोपी निरीक्षकाचे नाव आहे.
उमाकांत हा मागील काही दिवसांपासून एका महिला रेशन दुकानदाराच्या माेबाईलवर अश्लिल मॅसेज व व्हिडीओ पाठवित हाेता. विधवा असलेल्या त्या महिलेला हा प्रकार असह्य झाल्यानंतर सदर महिलेने रेशन दुकानदार संघटनेला याबाबतची माहिती दिली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या निरीक्षकाला समजावून सांगितले. मात्र त्याने हा प्रकार बंद केला नाही. मंगळवारी वालदे याच्याविराेधात कुरखेडा पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून त्याच्याविराेधात भादंवि कलम ३५४ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.