बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 06:36 IST2021-01-07T06:36:19+5:302021-01-07T06:36:35+5:30

माणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत आहे.

Rapist teacher arrested in Raigad | बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला अटक 

बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला अटक 

लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : परीक्षेत नापास करेन आणि आईची नोकरी घालवेन, अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात तीव्र भावना आहेत.


माणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत आहे. तिची आईही शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवर २०१६ पासून अत्याचार करीत असल्याचे समाेर आले आहे. पीडित मुलीला तुला नापास करेन आणि तुझ्या आईची नोकरी घालावेन, अशी धमकी देऊन हा नराधम शिक्षक तिच्यावर शरीरिक अत्याचार करीत होता. 


आरोपीवर गुन्हा दाखल  
n पीडित मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. माणगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे.
n माणगाव पोलिसांनी मदन वानखेडे याला अटक केली आहे. त्याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Rapist teacher arrested in Raigad