बाप प्रतापीच, मुलगा महा प्रतापी! पोस्कोचा आरोपी पोलिस कोठडीत, पोरगा व्हिडीओ काढत होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 20:07 IST2022-09-22T20:07:18+5:302022-09-22T20:07:45+5:30

एनआरआय पोलीस ठाण्यातली घटना : अटक व्यक्तीच्या मुलाचा प्रताप 

Rapist Father in police custody, son was making video in navi mumbai Police station | बाप प्रतापीच, मुलगा महा प्रतापी! पोस्कोचा आरोपी पोलिस कोठडीत, पोरगा व्हिडीओ काढत होता

बाप प्रतापीच, मुलगा महा प्रतापी! पोस्कोचा आरोपी पोलिस कोठडीत, पोरगा व्हिडीओ काढत होता

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पोलीस कोठडीत असलेल्या वडिलांचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉबिन राजकुमार असे त्याचे नाव असून तो पॉक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या राजकुमार येसूदासनचा मुलगा आहे. जेवण घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 

सीवूड येथे विनापरवाना ट्रस्ट चालवून चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राजकुमार येसूदासन याच्यावर गुन्हा दाखल आहे. यामध्ये त्याला अटक झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान तो सध्या एनआरआय पोलिसांकडे पोलीस कोठडीत आहे. त्यादरम्यान बुधवारी रात्री येसूदासन याचा मुलगा रॉबिन हा वडिलांसाठी जेवण घेऊन आला होता. रात्री १०.३० च्या सुमारास तो वडील येसूदासन असलेल्या कोठडीच्या भवती फिरताना दिसून आला. यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडील मोबाईल तपासला असता, तो मोबाईल मध्ये व्हिडीओ काढताना आढळून आला.

यामुळे कोठडीच्या परिसरात विनापरवाना व्हिडीओ काढून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी रॉबिन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तो व्हिडीओ कशाचा काढत होता व व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे वडील कोठडी बाहेर काय संदेश पोचवणारा होते याचा उलगडा झालेला नाही. 

Web Title: Rapist Father in police custody, son was making video in navi mumbai Police station