शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करून २ अल्पवयीन मुलींची हत्या करून लटकवले झाडाला; ७ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 21:24 IST

Rape and Murder : आत्महत्येसारखे दिसण्याच्या प्रयत्नात मृतदेह झाडावर टांगण्यात आले होते, अशी माहिती आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती महंता यांनी दिली. 

ठळक मुद्दे“दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्या या गुन्ह्याची उकल झाली आहे. 

गुवाहाटी - आसामच्या कोकराझार जिल्ह्यात झाडावर लटकलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून ठार मारून मृतदेह झाडावर लटकवले होते. आत्महत्येसारखे दिसण्याच्या प्रयत्नात मृतदेह झाडावर टांगण्यात आले होते, अशी माहिती आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती महंता यांनी दिली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी मध्यरात्री अटक केल्याच्या घटनेनंतर काही तासांनंतर महंत यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "आरोपींपैकी तीन आरोपी बलात्कार आणि हत्येमध्ये सामील होते तर इतर चार जणांनी तपासात पुरावे नष्ट केले आणि पोलिसांची दिशाभूल केली." “दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्या या गुन्ह्याची उकल झाली आहे. रविवारी गुवाहाटीपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकराझार जिल्ह्यातील बोडोलँड टेरिटोरियल प्रांतात मुख्यमंत्री रविवारी १६ आणि १४ वर्षांच्या दोन मुलींच्या कुटुंबास भेट देण्यासाठी गेले होते. त्यानंतर पोलिसांनी संशयितांची ओळख पटवल्याचा दावा केला होता. पण या दोन चुलत बहिणींची हत्या किंवा मृत्यू झाला आहे याची नक्की खात्री पटली नाही.कुटुंबाची भेट घेतल्यानंतर हिमंता बिस्वा कुमार यांनी सांगितले की, त्याने पोलिसांना सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. “जर त्यांचा खून झाला तर आरोपींना अटक करुन योग्य शिक्षा द्यावी आणि जर ही आत्महत्येची घटना असेल तर बहिणींना हे कृत्य करण्यास कोण कारणीभूत आहेत याची चौकशी झाली पाहिजे, ”असे त्यांनी रविवारी सांगितले. मंगळवारी आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती यांनी सांगितले की, मुलींची हत्या करण्यात आली.बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी आरोपींमध्ये मुझमिल शेख (२०), फरिझुल रहमान (२२) आणि नसीबुल शेख (१९) आहेत. आमचा या गुन्ह्यात आहे, ”असेही त्यांनी सांगितले.

डीजीपी पुढे म्हणाले की, पोलिसांनी आरोपीच्या मोबाइल फोनवरून डिलीट केलेला डेटा परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सुरुवातीच्या तपासाचा हवाला देत मुख्यमंत्र्यांनी रविवारी सांगितले की, पीडित आरोपींना बहुधा ओळखत होत्या असतील आणि गुन्ह्यापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला असेल. पोलिसांना अद्याप दोन्ही मुलींचा शवविच्छेदन अहवाल मिळालेला नाही, असे महंता म्हणाले. मुलींचा व्हिसेरा चाचण्यांसाठी ठेवण्यात आला आहे आणि आरोपी व पीडितांकडून गोळा केलेल्या पुराव्यांची डीएनए फिंगरप्रिंटिंग केली जाईल.

“आम्ही मंगळवारी गुन्हेगारीच्या घटनेचे पुन्हा एकदा क्राईम सीन केला,ज्यावेळी स्वतंत्र साक्षीदार, दंडाधिकारी आणि न्यायवैद्यक तज्ञ उपस्थित होते. मला खात्री आहे की, वैद्यकीय अहवाल आमच्या पुराव्यांशी  जुळतील, ”महंता म्हणाले.

टॅग्स :Arrestअटकsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणDeathमृत्यूAssamआसामPoliceपोलिस