पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 20:03 IST2019-11-05T20:01:18+5:302019-11-05T20:03:41+5:30

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार करुन तिच्या संमतीशिवाय तीनवेळा गर्भपात केला.

Raped on girl by attraction of marrige at Pimpri | पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार 

पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार 

ठळक मुद्देयाप्रकरणी २९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद,गुन्हा दाखल

पिंपरी :  लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करुन तिच्या संमतीशिवाय तीनवेळा गर्भपात केला. महिलेने हातउसने दिलेले पैसे परत मागितले असता तिला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहिदास नथु खाटपे (रा. गंगाधाम रोड, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला धमकी देऊन व लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. महिला गरोदर राहिली असता आरोपीने धमकावून महिलेचा तीनवेळा गर्भपात केला, असल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने आरोपी रोहिदास याला हातउसने १५ लाख रुपये दिले होते. ते पैसे महिलेने मागितले असता महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत. 

Web Title: Raped on girl by attraction of marrige at Pimpri