मंदिरात खेळत असलेल्या चिमुरडीवर बलात्कार,एक संशयित आरपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 19:07 IST2019-12-19T19:06:40+5:302019-12-19T19:07:38+5:30
नराधमाने चिमुरडीला वासनेची शिकार बनवताना अमानुषपणे तिच्यावर बलात्कार केला.

मंदिरात खेळत असलेल्या चिमुरडीवर बलात्कार,एक संशयित आरपी अटकेत
पुणे: पाषाण येथील भैरवनाथ मंदिरात एका अनोळखी नराधमाने सात वर्ष नऊ महिन्याच्या मुलीला वासनेची शिकार बनविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .याप्रकरणी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुतारवाडी येथील या घृणास्पद प्रकरणाविषयी स्थानिक ग्रामस्थांनी मध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. 16 डिसेंबर रोजी पीडित मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेले असताना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंदिराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीला नराधमाने मंदिराच्या कोपर्यात नेऊन तिला वासनेची शिकार बनवताना तिच्यावर अमानुषपणे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.
या घृणास्पद प्रकाराबद्दल बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाषाण सुतारवाडी परिसरामध्ये या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे .पोलीस नराधमाचा शोध घेत असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक माया देवरे करीत आहेत.