सलूनच्या मागील रुममध्ये अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; नवी मुंबईमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:13 IST2022-03-31T10:57:48+5:302022-03-31T15:13:45+5:30
मैत्री वाढवण्याच्या नादात नराधमाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

सलूनच्या मागील रुममध्ये अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; नवी मुंबईमधील धक्कादायक घटना
नवी मुंबई- उलवे सेक्टर २ मधील राहणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीची एका तीस वर्षीय विवाहित युवकासोबत चार महिन्यापूर्वी ओळख झाली. त्यानंतर मैत्री वाढवण्याच्या नादात नराधमाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
सदर पीडित शारीरिक संबंधातून ती दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती राहिली संपूर्ण प्रकार मुलीच्या आईला कळताच आईने त्वरित एन.आर.आय. पोलीस स्टेशनमध्येवरील प्रकरणाची तक्रार दाखल केली चौकशीतून मुलगी दोन ते अडीच महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने तिला काम करत असलेल्या सलूनच्या मागच्या रूममध्ये नेऊन संबंध बनविले. मुलगी दोन ते अडीच महिन्याची गर्भवती असल्याने पॉक्सो अंतर्गत गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीला अटक केली असता त्याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असून पुढील तपास सुरू असल्याचे यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.