१५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केलं; जव्हारमधील घटना, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 21:35 IST2021-10-12T21:35:26+5:302021-10-12T21:35:33+5:30
सोमवारी एका व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केलं; जव्हारमधील घटना, आरोपीला अटक
- हुसेन मेमन
जव्हार- जव्हार तालुक्यातील देहरे पैकी चिरेचापाडा येथील एका 15 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देत सतत शारीरिक संबंध करीत गर्भवती केल्याची घटना घडली असून, सोमवारी एका व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडोली येथील शैलेश लक्ष्मण आचारी वय 20 वर्षे या तरुणाने पीडित मुलीला शाळेत असतांना जवळीक साधली त्यांचे एकमेकांवर प्रेम करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेत आरोपीने तिच्या सोबत जून 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती करत तिने सातव्या महिन्यातच एका नवजात बालकाला जन्म दिले आहे. आरोपी विरुद्धाथ पोक्सो तथा लैंगिक अप्राधापासून बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करीत आहेत.