असाह्यपणाचा गैरफायदा घेत सावत्र चुलत्याने केला महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 18:27 IST2019-10-16T18:25:51+5:302019-10-16T18:27:39+5:30
आजोबाची देखभाल करण्यासाठी गेलेल्या महिलेवर सावत्र चुलत्याने अत्याचार केला...

असाह्यपणाचा गैरफायदा घेत सावत्र चुलत्याने केला महिलेवर अत्याचार
पिंपरी : आजोबाची देखभाल करण्यासाठी गेलेल्या महिलेवर सावत्र चुलत्याने अत्याचार केला. मुलीचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन महिलेच्या गैरफायदा घेत असाह्यपणाचा गैरफायदा घेतला. आळंदीजवळ फेब्रुवारी ते एप्रिल २०१८ दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोसरी येथील एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित महिलेचा सावत्र चुलता आहे. महिलेच्या आजोबाचा अपघात झाल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी आरोपीने फिर्यादी महिलेला बोलावून घेतले. त्यानंतर मुलीचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या असाह्यपणाचा आरोपीने गैरफायदा घेतला. महिलेशी शरीरसंबंध करून तिच्यावर अत्याचार केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.