शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:46 IST

Rape Victim wrote letter by blood : पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली सुरेंद्र कुमार यादवने तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्या अटकेपासून दूर आहे.

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील बलात्कार पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. बलात्कार पीडितेने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली सुरेंद्र कुमार यादवने तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्याअटकेपासून दूर आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण?प्रकरण शहर कोतवाली भागातील आहे. येथे राहणाऱ्या एका विधवा महिलेने आरोप केला आहे की, भाडोखर पोलीस स्टेशन हद्दीतील शेरगंज गावात राहणाऱ्या शिपाईने लग्नाच्या नावाखाली तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेच्या बहिणीचे सासर त्याच गावात आहे. तेथे येत असताना पीडितेचा पोलीस शिपायाशी संपर्क झाला. त्यानंतर शिपायाने लग्नाच्या नावाखाली पीडितेवर शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.यादरम्यान शिपायाने तिच्याकडून चार लाख रुपयेही घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे. नंतर पोलीस शिपायाच्या हेतूवर संशय आल्याने पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला. त्याच्या सुटकेसाठी शिपायाने आपला मोबाईल बंद केल्याचा आरोप आहे. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर पीडितेने नगर कोतवालीत तक्रार दिली.

रक्ताने लिहिले पत्र पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोलीस शिपायाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पीडितेने अटकेसाठी गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षकांकडेही धाव घेतली. असे असतानाही पोलीस शिपायाला अटक न केल्याबद्दल पीडितेने आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आरोपीच्या भावाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने पत्रात केला आहे. यासोबतच सीएम योगी यांना इच्छामरणास परवानगी द्या किंवा न्याय मिळवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथArrestअटक