बेशुध्द करत तरूणीवर बलात्कार ; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 14:30 IST2019-02-13T14:24:36+5:302019-02-13T14:30:08+5:30
आरोपीने मोटारीतून सोडतो असे सांगून तिला कॉफी पाजण्यास नेले. ती बेशुद्ध झाली असता तरुणीला वाल्हेकरवाडीतील एका खोलीत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

बेशुध्द करत तरूणीवर बलात्कार ; आरोपीला अटक
पिंपरी : तू मला खूप आवडतेस असे म्हणत आरोपीने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. नंतर काही दिवसांनी निगडी येथे आरोपीने तरूणीचा पाठलाग केला. मोटारीतून सोडतो असे सांगून तिला कॉफी पाजण्यास नेले. ती बेशुद्ध झाली असता तरुणीला वाल्हेकरवाडीतील एका खोलीत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुरेंद्र सोनू ओमप्रकाश सारसर असे आरोपीचे नाव असून त्यास निगडी पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र उर्फ सोनू ओमप्रकाश सारसर (वय ३८,रा.देहुगाव) असे आरोपीचे नाव आहे. २३ वर्षीय तरूणीने आरोपीविरोधात फिर्याद नोंदवली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वाल्हेकरवाडी येथे खोली भाड्याने घेऊन त्याने मारहाण करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.