रक्षकचं बनले हैवान! स्मशानभूमीतच दोन सख्ख्या बहिणींवर केला 2 सुरक्षारक्षकांनी बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 09:41 PM2021-06-22T21:41:26+5:302021-06-23T06:44:31+5:30

Rape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा ही घटना त्यांच्यासमोर उघडकीस आली असून त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही सैन्याच्या जवानांना अटक केली आहे.

Rape of two sisters at the cemetery; Two security personnel arrested | रक्षकचं बनले हैवान! स्मशानभूमीतच दोन सख्ख्या बहिणींवर केला 2 सुरक्षारक्षकांनी बलात्कार

रक्षकचं बनले हैवान! स्मशानभूमीतच दोन सख्ख्या बहिणींवर केला 2 सुरक्षारक्षकांनी बलात्कार

Next
ठळक मुद्देसंदीप ढाका आणि नीरज अशी त्यांची नावे सांगण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पीडित मुलींचे जबाब सीआरपीसी 164 अंतर्गत नोंदविण्यात येणार आहेत.

दिल्ली कॅन्ट भागात दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात पोलिसांनी सैन्याच्या दोन जवानांना अटक केली आहे. या दोन्ही बहिणी सागरपूर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांच्यासोबतची घटना सागरपूर येथील स्मशानभूमीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा ही घटना त्यांच्यासमोर उघडकीस आली असून त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही सैन्याच्या जवानांना अटक केली आहे. संदीप ढाका आणि नीरज अशी त्यांची नावे सांगण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी आपल्या तक्रारीत सांगितले की, स्मशानभूमीत जिथे लाकडं ठेवली होती, त्या ठिकाणी ही घटना त्यांच्याबरोबर घडविण्यात आली.

पोलिस मुलींचे जबाब नोंदवतील

दोन्ही पीडित बहिणी २० आणि २२ वर्षांच्या असून त्या दिल्ली कॅन्ट भागातील रहिवासी आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून नोंदविलेल्या एफआयआरची प्रत्येक कान्याकोपऱ्यातून चौकशी केली जात आहे. या पीडित मुलींचे जबाब सीआरपीसी 164 अंतर्गत नोंदविण्यात येणार आहेत. मात्र, पोलीस मुलींकडून केलेल्या आरोपाचा कसून शोध घेत आहेत आणि त्या आरोपांचे सत्य जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.पीडित बहिणींनी असा आरोप केला आहे की, त्यांना धमकावले आणि स्मशानभूमीत नेऊन ठेवले, जिथे त्यांच्यावर बलात्कार केला गेला. फिर्यादीनुसार कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

 

Web Title: Rape of two sisters at the cemetery; Two security personnel arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app