नशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 09:57 IST2021-08-25T09:56:54+5:302021-08-25T09:57:21+5:30

Crime News : पीडित मुलीने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २४) फिर्याद दिली.

Rape of a minor girl by injection of drugs | नशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी : अल्पवयीन मुलीला नशेचे इंजेक्शन देऊन मारहाण केली. तसेच तिच्यावर बलात्कार केला. मुळशी तालुक्यातील भुकुम येथे २५ सप्टेंबर २०२० ते १७ जुलै २०२१ या कालावधीत ही घटना घडली. 

पीडित मुलीने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २४) फिर्याद दिली. समीर विजय भालेराव उर्फ डॉनी सिंग/रॅपर बॉय (वय २८, रा. भुकुम, ता. मुळशी), असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ या दोघांना त्यांच्या पालकांच्या ताब्यातून वाहनात घालून त्याच्या घरी नेले. त्यांना बाहेर जाण्यास अटकाव केला. 

तसेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलीला नशेचे इंजेक्शन देऊन मारहाण केली. तिच्या वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही आरोपीने दिली.
 

Web Title: Rape of a minor girl by injection of drugs