फ्लॅट पाहण्याच्या बहाण्याने बोलावून महिला प्रॉपर्टी ब्रोकरवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 20:22 IST2021-12-08T20:21:46+5:302021-12-08T20:22:59+5:30
Rape Case : मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये राहणारी २७ वर्षांची तरुणी प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय करत होती. गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायात तिचा जम बसला होता. अनिल शर्मा उर्फ कृष्णा नावाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली होती.

फ्लॅट पाहण्याच्या बहाण्याने बोलावून महिला प्रॉपर्टी ब्रोकरवर बलात्कार
ग्वालियर - प्रॉपर्टी डिलरचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला तिच्या मित्राने फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्याला एक फ्लॅट भाड्याने घ्यायचा आहे, असं सांगत फ्लॅट पाहण्यासाठी मित्राने तिला बोलावलं आणि तिचे लैंगिक शोषण केले. या दुष्कृत्यात ब्रोकरचा मित्र देखील सहभागी होता.
मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये राहणारी २७ वर्षांची तरुणी प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय करत होती. गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायात तिचा जम बसला होता. अनिल शर्मा उर्फ कृष्णा नावाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली होती. बस ऑपरेटरचं काम करणाऱ्या अनिलने एक दिवस महिलेला प्रॉपर्टी पाहण्याच्या बहाण्यानं बोलावलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
अनिलने महिलेला फोन करून आपल्याला एक घर भाड्याने घ्यायचं असल्याचं सांगितलं. काही दिवसांनी त्याने महिलेला पुन्हा फोन केला आणि आपण एक फ्लॅट निश्चित केला असून फ्लॅट पाहायला येण्याची विनंती केली. तिला फ्लॅटचा पत्ता देखील दिला. महिला आपल्या स्कुटीवरून दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. त्यानंतर तिला त्याने पाण्यातून गुंगीचं औषध दिलं. पाणी प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर अनिल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या आणखी एका मित्राने महिलेवर लैंगिक अत्याचार केले.
महिला शुद्धीवर आल्यानंतर दोघांनी या घटनेबाबत कुठेही न सांगण्यासाठी धमकी दिली. तिची स्कुटीदेखील त्यांनी स्वतःकडे ठेवली आणि महिलेला तिथून हाकलून दिलं. महिलेनं त्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरू केला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.