बलात्कार, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर धर्मांतरण प्रकरण; अमीन शेखला 4 दिवसांची कोठडी
By धीरज परब | Updated: July 18, 2023 21:43 IST2023-07-18T21:43:05+5:302023-07-18T21:43:56+5:30
नया नगर पोलिसांनी अमीनचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणीही सुरू केली आहे.

बलात्कार, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर धर्मांतरण प्रकरण; अमीन शेखला 4 दिवसांची कोठडी
मीरारोड - मीरारोड येथील २२ वर्षीय तरुणीला आत्महत्या करण्याची भीती दाखवून बलात्कार, नग्न व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर तिचा निकाह आणि धर्मांतरण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अमीन शेखला (२४ ) ठाणे न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नया नगर पोलिसांनी अमीनचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणीही सुरू केली आहे.
याशिवाय पोलिसींनी अमीनची आई रेश्मा हिलाही नोटीस बजावली आहे. तर काझी, मित्र झरियाब व अन्य एकाससुद्धा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पीडितेला धमकावून केलेला निकाह व धर्मांतर बाबत पोलीस कायदेशीर बाबी तपासत आहेत. ते स्टॅम्प पेपर पोलिसांना पिडीतीने दिले आहेत.
अमीन ची आई रेश्मा ही पीडितेला बळजबरी दुबईला पाठवणार होती. अमीन ने आधीच लग्न झाले असल्याचे व पहिल्या पत्नी पासून मुलगी असल्याची बाब लपवून ठेवली होती असे पीडितेने फिर्यादीत म्हटले होते. पोलिस हे पीडिता सांगत असलेले ते अश्लील व्हिडीओ तसेच तिला बळजबरीने वांद्रे येथे ज्या गाडीतून नेले ती गाडी शोधत आहेत.