भाजपच्या नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 15:16 IST2019-09-04T15:14:47+5:302019-09-04T15:16:14+5:30
न्यायालयाच्या आदेशाने वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
ठाणे - भाजप नगरसेवकावर एका बारमधील सिंगरने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास कांबळे असे या नगरसेवकाचे नाव असून त्याच्यासह संदिप साळवे आणि लव्हा यांच्या विरोधातही या महिलेने तक्रार केली आहे.
ठाण्यातील सावकरनगर येथील एका ३२ वर्षीय तरूणीला विलास कांबळे याने लग्न करण्याचे अश्वासन दिले होते. याच लग्नाच्या आमिषाने फसवून ह्या व्यक्तीने तीच्यावर २०१७ ते २०१९ पर्यंत वारंवार फसवणूक करून बलात्कार केला. तर त्याचे मित्र संदिप साळवे व लव्हा यांनी त्याच्या विनयभंगाचा प्रकार केला. तिच्या घरामध्ये घुसून तिला ठार मारण्याचीही धमकी दिली होती. दोस्ती विहार वृष्टी बि विंग इथे हा प्रकार झाल्याचे या महिलेच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. विलास कांबळे हा बहुजन सामजवादी पार्टीमधून निवडून आला असून २०१६ मध्ये त्यांनी भाजप भाजप प्रवेश केला. प्रभाग क्रमांक १५ ड मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांची पत्नीही नगरसेविका आहे.