लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पळवून नेऊन अत्याचार; तरुणावर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: May 10, 2023 15:44 IST2023-05-10T15:44:18+5:302023-05-10T15:44:26+5:30

पीडित महिलेची एप्रिल महिन्यामध्ये एका तरुणाशी विवाह झाला होता.

Rape by abducting a woman on the pretense of marriage; Case register in solapur | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पळवून नेऊन अत्याचार; तरुणावर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पळवून नेऊन अत्याचार; तरुणावर गुन्हा

सोलापूर : मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून पीडित महिलेला पळवून नेऊन उमरगा शिवारात अत्याचार करत, नंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी तरुणावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनील दुर्गप्पा कोळी ( रा. उमरगा, उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित महिलेची एप्रिल महिन्यामध्ये एका तरुणाशी विवाह झाला होता. तिचे लग्नापूर्वी आरोपीशी ओळख होती. त्या तरूणाने म्हणजेच आरोपी सुनील कोळी याने पीडितेला लग्नानंतर मी तुझ्यासोबत लग्न करतो, तुला चांगले सुखी ठेवतो असे आमिष दाखवून आणाभाखा खात होता. १ मे रोजी आरोपीने पीडितेला एसटी स्टॅन्ड परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून उमरगा येथील एका झोपडीत नेऊन पीडितेने विरोध करूनही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने आपण लवकर लग्न करू असे सांगून पीडितेला आई वडिलांकडे पाठविले. पण आई वडिलांनी पीडितेला घरात न घेतल्याने पीडिता पुन्हा आरोपीच्या घरी गेली. त्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील कोळी याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Rape by abducting a woman on the pretense of marriage; Case register in solapur