लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 17:31 IST2019-07-26T17:17:45+5:302019-07-26T17:31:06+5:30
२७ वर्षीय पीडित महिलेला आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला. तसेच लग्न करण्यास टाळाटाळ केली.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून फसवणूक
पिंपरी : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यात ती महिला गरोदर राहिली. त्यानंतर तिची आर्थिक फसवणूक करत तसेच तिला धमकावत गर्भपात करण्यास भाग पाडले. ही घटना फेब्रुवारी २०१८ ते मे २०१९ या कालावधीत घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण राहुल तळेगावकर (वय २३, रा. कात्रज, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पीडित महिलेला आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला. तसेच लग्न करण्यास टाळाटाळ केली. महिला गरोदर राहिल्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. तिचा विश्वास संपादन करून ६ लाख ६० हजार रोख रक्कम घेऊन परत केले नाहीत. महिलेकडे असलेली दोन तोळ्यांची सोनसाखळी तसेच तिच्या वडिलांच्या नावे असलेली दुचाकी घेऊन आरोपीने परत न करता आर्थिक फसवणूक केली. तुझी व तुज्या घरच्यांची लाईफ बरबाद करून टाकेन, अशी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.