Ranya Rao : रान्या रावसाठी दुबई होतं दुसरं घर; २४ तासांत बंगळुरूला परत, सोनं आणताना घालायची खास ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:43 IST2025-03-20T13:40:47+5:302025-03-20T13:43:26+5:30

Ranya Rao : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेल्या रान्या रावची भारत ते दुबई ट्रॅव्हल हिस्ट्री धक्कादायक आहे.

Ranya Rao gold smuggling investigation dubai gold case investigation dri investigation | Ranya Rao : रान्या रावसाठी दुबई होतं दुसरं घर; २४ तासांत बंगळुरूला परत, सोनं आणताना घालायची खास ड्रेस

Ranya Rao : रान्या रावसाठी दुबई होतं दुसरं घर; २४ तासांत बंगळुरूला परत, सोनं आणताना घालायची खास ड्रेस

सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेल्या रान्या रावची भारत ते दुबई ट्रॅव्हल हिस्ट्री धक्कादायक आहे. रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता रान्या सोनं आणताना खास ड्रेस कोड करायची असं समोर आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) अभिनेत्रीच्या सोन्याच्या तस्करीच्या कारवाया उघड करण्यासाठी तिच्या ट्रॅव्हल पॅटर्नची चौकशी करत आहे. भारतातील ज्या विमानतळांवरून रान्या रावने प्रवास केला आहे त्या विमानतळांची संपूर्ण माहिती अधिकारी गोळा करत आहेत.

आतापर्यंतच्या तपासात असं समोर आलं आहे की, २०२० पासून आतापर्यंत रान्याने ९० वेळा परदेश प्रवास केला आहे. तिने बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६० वेळा प्रवास केला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ वेळा प्रवास केला आहे. तसेच रान्याने चेन्नई आणि हैदराबाद येथून प्रत्येकी दोन आणि कोलकाता येथून एकदा प्रवास केला.

२४ तासांच्या आत दुबईहून यायची परत

एवढंच नाही तर जानेवारी २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान रान्याने ४६ वेळा प्रवास केला. हा सर्व प्रवास बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईपर्यंत होता. रान्याचे बहुतेक प्रवास पर्यटक व्हिसावर होते. तपासात असं दिसून आलं आहे की, रान्या बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जात होती आणि २४ तासांच्या आत दुबईहून परत येत होती.

रान्याचा खास ड्रेस कोड 

रान्याने २८ जुलै २०२३ रोजी अशा प्रकारच्या प्रवासाचा पॅटर्न सुरू केला. आतापर्यंत अशा ५१ ट्रिप झाल्या आहेत. या प्रत्येक प्रवासात सोन्याची तस्करी झाली होती या वस्तुस्थितीला यामुळे बळकटी मिळते. रान्याचा खास ड्रेस कोड देखील तस्करीतील एक मोठी गोष्ट आहे, जी हळूहळू उघड होत आहे. जेव्हा अधिकाऱ्यांनी तिच्या प्रवासाच्या तारखा पाहिल्या आणि तिचा ड्रेसकोड पाहिला तेव्हा काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या.

जीन्स आणि जॅकेट घालून परतायची

रान्या राव सहसा कॅज्युअल ड्रेसमध्ये दुबईला जायची आणि परतताना जीन्स आणि जॅकेट घालूनच यायची. ती कधीही जॅकेट न घालता परत आली नव्हती. हे देखील एका खास पद्धतीने डिझाइन केलेले होते. बहुतेक वेळा, विमानतळावरून सहज बाहेर पडण्यासाठी तिच्यासोबत प्रोटोकॉल अधिकारी असायचे.
 

Web Title: Ranya Rao gold smuggling investigation dubai gold case investigation dri investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.