प्रेयसीला भेटायला घरी गेला प्रियकर, पतीसोबत झाला आमना-सामना; तिघांचाही खेळ खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:56 AM2021-09-29T11:56:17+5:302021-09-29T11:56:24+5:30

रांचीच्या मोहननगरमध्ये झालेल्या भांडणात एका सीसीएल कर्मचाऱ्यासहीत तीन लोकांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.

Ranchi : Cause of death of three due to mutual assault and illicit relationshi | प्रेयसीला भेटायला घरी गेला प्रियकर, पतीसोबत झाला आमना-सामना; तिघांचाही खेळ खल्लास

प्रेयसीला भेटायला घरी गेला प्रियकर, पतीसोबत झाला आमना-सामना; तिघांचाही खेळ खल्लास

Next

झारखंडची राजधानी रांचीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधामुळे तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एका मुलीच्या डोळ्यात चाकू लागला. रांचीच्या मोहननगरमध्ये झालेल्या भांडणात एका सीसीएल कर्मचाऱ्यासहीत तीन लोकांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.

मीडिया रिपोर्टनुसार, मोहननगर येथे राहणारा देव प्रसाद मेहरची पत्नी कौशल्यासोबत तेथीलच एक तरूण प्रकाशचे संबंध होते. मंगळवारी रात्री प्रकाश देव प्रसादच्या घरात विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता.

यावेळी देव प्रसाद घरातच होता. प्रकाश घरात आल्यावर देव प्रसाद आणि प्रकाश यांच्यात जोरदार मारामारी झाली. ज्यात घटनास्थळीच प्रकाश आणि कौशल्याचा मृत्यू झाला. जखमी देव प्रसाद आणि त्याच्या मुलीली उपचारासाठी सीसीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान देव प्रसादचा मृत्यू झाला.  मुलीच्या डोळ्यात चाकू लागला, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सगळीकडे रक्तच रक्त

ही घटना रात्री साधारण ८ ते ९ वाजता दरम्यानची  आहे. मृत लोकांमध्ये सीसीएल कर्मचारी देव प्रसाद, त्याची पत्नी कौशल्या देवी आणि तिचा प्रियकर प्रकाश यांचा समावेश आहे. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना घरात सगळीकडे रक्तच रक्त दिसलं. 

पोलीस अधिकारी फरीद आलम म्हणाले की, स्थानिक लोकांची चौकशी केल्यावर हे प्रकरण अनैतिक संबंधाचं असल्याचं समजलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. सूत्रांनुसार, देव प्रसादची पत्नी कौशल्या देवी हिचं प्रकाशसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. जेव्हा देव प्रसाद घरात होताच तेव्हाच प्रकाश घरात शिरला. ज्यानंतर वाद झला. पण हत्या कोणत्या कारणाने झाली हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
 

Web Title: Ranchi : Cause of death of three due to mutual assault and illicit relationshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.