रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरूच; शासकीय रूग्णालयातील ब्रदरसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 13:00 IST2021-04-25T12:59:17+5:302021-04-25T13:00:33+5:30
Ramdesivir's black marketing : पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरूच; शासकीय रूग्णालयातील ब्रदरसह दोघांना अटक
ठळक मुद्देसुमित सुधीर हुपरीकर (रा. समृध्दीनगर, विश्रामबाग सांगली) आणि दाविद सतीश वाघमारे (रा. कुपवाड रोड,विजयनगर,सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
सांगली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही वाढत आहे. या स्थितीत रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना सांगलीतअटक करण्यात आली. यात मिरज कोविड रूग्णालयातील ब्रदरसह सांगलीतील एका खासगी प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञाचा समावेश आहे. सुमित सुधीर हुपरीकर (रा. समृध्दीनगर, विश्रामबाग सांगली) आणि दाविद सतीश वाघमारे (रा. कुपवाड रोड,विजयनगर,सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी रेमडेसिविरची एक ३० हजाराला अशी २ इंजेक्शन ६० हजार रूपयांना विकल्याची माहिती आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.