शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

चिपळुणातील रामदास सावंत खूनप्रकरण, पाेलीस अधिकारी सुरज गुरव यांना 'बेस्ट डिटेक्शन' रिवाॅर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 3:36 PM

Best Detection Award of Police Officer : जलद गतीने केला होता तपास

ठळक मुद्देत्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणून सुरज गुरव यांनी पदभार स्वीकारताच हे आव्हान स्वीकारले आणि पुन्हा तपासला सुरुवात केली होती.

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास जलद लावल्याने तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस महासंचालक यांचे 'बेस्ट डिटेक्शन' रिवाॅर्ड देण्यात आले.येथील नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांचा १ जानेवारी रोजी खून करण्यात आला होता. २ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्याच घराजवळील शेतात आढळून आला. मात्र, या खून प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी डोकेदुखी बनला होता. पोलिसांची चार पथके सलग दोन महिने अहोरात्र या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, यश येत नव्हते. साहजिकच चिपळूण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.त्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणून सुरज गुरव यांनी पदभार स्वीकारताच हे आव्हान स्वीकारले आणि पुन्हा तपासला सुरुवात केली होती. पोलीस निरीक्षक देवेन्द्र पोळ, शिरीष सासणे, उपनिरीक्षक शरद कुवेस्कर, सचिन दाभाडे, पोलीस कर्मचारी योगेश नार्वेकर, पंकज पडलेकर, मनोज कुळे, इम्रान शेख, गणेश पटेकर, विजय आंबेकर, रमीज शेख, मिलिंद चव्हाण, सुनील गुरव, संदीप नाईक यांच्या टीमने या प्रकणाच्या तपासात सतत काम करत होती.  सुरज गुरव तसेच पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन या टीमला मिळाले आणि अखेर यश आले. शहरानजीकच्या खेर्डी येथे राहणार आकाशकुमार नायर (२३) याला या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा झाला. तसेच आरोपी नायर याने खुनाची कबुली देखील दिली. पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीची दखल घेत विशेष पोलीस महासंचालक नवल बजाज यांनी या टीमला रोख ४३ हजार इतके बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर आता सुरज गुरव यांच्यासोबत त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, योगेश नार्वेकर, पंकज पडेलकर यांना ही पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवाॅर्ड देण्यात आले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरीMurderखून