Rakesh Maria Book : "Dawood has taken supari to kill Kasab by LeT but kasab want to keep alive" | Rakesh Maria Book : "दाऊदने कसाबची सुपारी घेतलेली, पण त्याला जिवंत ठेवायचेच होते"

Rakesh Maria Book : "दाऊदने कसाबची सुपारी घेतलेली, पण त्याला जिवंत ठेवायचेच होते"

ठळक मुद्देएकमेव जिवंत पुरावा असल्याने त्याला मारण्यासाठी पाकिस्तान आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ मारण्यासाठी प्रयत्न करीत होते, असा दावा मारिया यांनी केला आहे. ‘२६/११’च्या हल्याचा तपास राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता.

मुंबईमुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला हा हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे,असा पाकिस्तानचा कट होता, त्यासाठी सर्व अतिरेक्यांकडे खोटी ओळखपत्रे देवून त्याला भगवा रंग देण्याचा प्रयत्न होता. मात्र अजमल कसाब जिवंत सापडल्याने त्यांचा डाव फसला, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ (Let me say it Now) या आत्मचरित्रात केला आहे.

मारिया यांनी आपल्या पुस्तकात पोलीस दलातील राजकारण आणि राजकीय हस्तक्षेपाबाबतही भाष्य केले असून त्यांचे तत्कालिन सहकारी व एटीएसचे प्रमुख देवेन भारती आणि माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यावर टीका केली आहे.मात्र दोघांनीही त्याचा इन्कार केला आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तपासात अतिरिक्त स्वारस्थ दाखवित असल्याने तत्कालिन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मुंबईच्या आयुक्तपदावरुन उचलबांगडी केली. त्यांच्या अपमर्जीमुळे सेवाजेष्ठता असूनही त्यांना ‘होमगार्ड’मध्येच निवृत्त व्हावे लागले.


‘२६/११’च्या हल्याचा तपास राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. हल्याच्या अनुषंगाने त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने २६/११ हल्ला हा हिंदू दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता.१० हल्लेखोरांना हिंदू सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावट ओळखपत्रे पाठवली होती. कसाबकडेही एक ओळखपत्र होते, त्यावर समीर चौधरी असं नाव लिहिले होते. त्याच्या घराचा पत्ता बंगळुरु व हैदराबादच्या दिलकुशनगरमधील एका महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे नमूद केले होते.


कसाबशी संबंधित माहिती गोपनीय ठेवणं मोठे आव्हान होते, त्याला जिवंत ठेवणे माझी प्राथमिकता होती. त्याचा फोटो किंवा अधिक माहिती जारी करायचीच नव्हती. मीडियाला त्याची माहिती मिळू नये, असा आमचा प्रयत्न होता. खटल्याच्या वेळीही पाकिस्तानचा मुखवटा फाटत होता, त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीला कसाबला मारण्याची सुपारी मिळाली होती, कसाबला जिवंत ठेवणे माझी प्राथमिकता होती. एकमेव जिवंत पुरावा असल्याने त्याला मारण्यासाठी पाकिस्तान आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ मारण्यासाठी प्रयत्न करीत होते, असा दावा मारिया यांनी केला आहे.

माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यावर निशाणा
 

गृहसचिवांनी मेसेजच्या माध्यमातून माझी तात्काळ बदली केल्याचं राकेश मारिया यांनी आत्मकथेत पुढे लिहिलं आहे. त्यानंतर अहमद जावेद यांना पोलीस आयुक्तपदी नेण्यात आलं. जावेद आणि शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांची चांगली मैत्री होती. जावेद त्याला ईदच्या पार्टीसाठी घरी बोलावत असत. त्यामुळे शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर परिणाम होणारच, असा दावा राकेश मारिया यांनी पुस्तकात केला आहे.

मारियांकडून आणखी काय अपेक्षा करणार?-  अहमद जावेद

राकेश मारिया यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना अहमद जावेद म्हणाले की, ‘ त्यांचे आरोप बिनबुडाचे आणि आश्चर्यकारक आहेत. त्यामध्ये विसंगती, चुकीची माहिती, आणि दिशाभूल करणारे संदर्भ दिले आहेत, त्यांनी लिहिण्यापूर्वी माझ्याकडे विचारणा केली असती तर मी त्यांना खरे संदर्भ दिले असते. मात्र, मारिया यांच्याकडून आपण आणखी दुसरी काय अपेक्षा करु शकतो, असा सवाल त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Sheena Bora Murder Case : मारियांचे पुस्तकी दावे 'त्या' पोलीस अधिकाऱ्याने फेटाळले; पुस्तक खपासाठी मार्केटिंग

 

Video : Sheena Bora Murder Case : खळबळजनक! राकेश मारियांनी पुस्तकातून केला गौप्यस्फोट


संजय पाण्डये कर्तव्यदक्ष,प्रामाणिक अधिकारी
अहमद जावेद, देवन भारती यांच्यावर कठोर शब्दात टीका करणाऱ्या मारिया यांनी आयपीएस संजय पाण्डये यांच्याबाबत मात्र अतिशय प्रामाणिक आणि धडाडीने काम करणारा अधिकारी आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत. आयुक्तपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर ‘होमगार्ड’ रिटायर होईपर्यंत ते उपमहासमादेशक पाण्ड्ये यांच्यासमवेत काम केले. त्यांच्यासमवेत होमगार्डच्या मुलभूत समस्या व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत निवृत्तीपर्यंतचा काळ व्यतित केल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
 

English summary :
Former mumbai commissioner rakesh-maria disclosed many things on 26/11 mumbai terror attack convict ajmal kasab in his autobiography. Lashkar-e-Taiba (LeT) had planned to project the 26/11 Mumbai terror attack as a case of “Hindu terror” and Pakistani terrorist Mohammed Ajmal Kasab to die as Bengaluru’s Samir Chaudhari and given supari to underworld don dawood ibrahim

Web Title: Rakesh Maria Book : "Dawood has taken supari to kill Kasab by LeT but kasab want to keep alive"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.