लग्नाच्या दोन महिन्यांनी घटस्फोट, मग लिव इन, खूश नाही झाली म्हणून फोडलं पार्टनर डोकं; हॉस्पिटलमध्ये सोडून फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 13:38 IST2021-12-18T13:38:01+5:302021-12-18T13:38:41+5:30
Rajasthan Crime News : मीडिया रिपोर्टनुसार, पूनम जाटव नावाची महिला करण सिंह नावाच्या व्यक्तीसोबत शहरातील बुध विहार कॉलनीतील एका भाड्याच्या घरात राहत होती.

लग्नाच्या दोन महिन्यांनी घटस्फोट, मग लिव इन, खूश नाही झाली म्हणून फोडलं पार्टनर डोकं; हॉस्पिटलमध्ये सोडून फरार
राजस्थानच्या (Rajasthan) अलवरमधून (Alwar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या पार्टनरच्या डोक्यात काठी मारून त्याला जखमी केलं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि मग तेथून फरार झाली. महिला तिच्या पार्टनरसोबत लिव इन रिलेशनमध्ये राहत होती. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पूनम जाटव नावाची महिला करण सिंह नावाच्या व्यक्तीसोबत शहरातील बुध विहार कॉलनीतील एका भाड्याच्या घरात राहत होती. गेल्या २५ जूनला दोघांमध्ये भांडण झालं होतं. ज्यानंतर पूनमने पूर्ण ताकदीने करणच्या डोक्यावर काठीने वार केला होता. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर महिलेने करणच्या वडिलांना फोन करून याची माहिती दिली. करणच्या वडिलांनी तिला सांगितलं की त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल कर.
पार्टनरला सोडून फरार
करणच्या वडिलांनी त्यांचा मोठा मुलगा दीपकला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. महिला तर करण बेशुद्ध असतानाच त्याला सोडून फरार झाली होती. नंतर उपचारा दरम्यान करणचा मृत्यू झाला. करणच्या परिवाराने पूनम विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
५ महिन्यांनी महिलेला अटक
पोलिसांनी एफआयआर दाखल करत तिचा तपास सुरू केला. पोलिसांनी साधारण ५ महिन्यांनी पूनमला अटक केली. पोलिसांनी तिचा अनेक महिने शोध घेतला, पण तिचा काही पत्ता लागला नव्हता. आता पोलिसांनी सांगितलं की, पूनम तिच्या मैत्रिणींच्या घरी फिरत होती. तिला एका खबऱ्याच्या माहितीवरून अटक करण्यात आली. पूनमला पार्टनरच्या हत्ये प्रकरणी कोर्टाने तुरूंगात पाठवलं आहे.
आधीही झाला होता घटस्फोट
पोलिसांनी सांगितलं की, पूनमने काही वर्षाआधी लग्न केलं होतं. पण तिच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती करणसोबत अनेक वर्षापासून लिव इनमध्ये राहत होती.