फेसबुकवर 6 हजार फॉलोवर, मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 14:52 IST2020-01-21T14:49:36+5:302020-01-21T14:52:00+5:30
पोलिसांनी आरोपी अयाज याला अटक केली आहे.

फेसबुकवर 6 हजार फॉलोवर, मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या
जयपूर : मोबाईलवर सतत व्यस्त असल्यामुळे पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी अयाज अहमद अंसारी (26) याने पत्नी रेश्मा उर्फ नैना मंगलानी हिला फिरायला जाण्यासाठी बोलविले. यानंतर अयाजने जयपूर-दिल्ली हायवेजवळ नेऊन रेश्माचा गळा दाबून तिची हत्या केली. तसेच, हत्या केल्यानंतर रेश्माची ओळख पटू नये म्हणून अयाजने तिच्या डोक्यावर दगडाने वार केले.
रेश्माच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी अयाज याला अटक केली आहे. पत्नी रेश्मा हिचे फेसबुकवर सहा हजारहून अधिक फॉलोअर आहेत. ती दिवसभर फक्त मोबाईलवर व्यस्त राहत होती. यामुळे आमच्या दोघांमध्ये सतत भांडण व्हायचे. या कारणामुळे त्रस्त होऊन तिच्या हत्येचा कट रचला, असे अयाज याने पोलिसांच्या चौकशीनंतर सांगितले.
याचबरोबर, रविवारी सकाळी अयाजने रेश्माला दिवसभर फिरविले. त्यानंतर संध्याकाळी अंधार झाल्यानंतर जयपूर-दिल्ली हायवेजवळ नेऊन तिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली अयाजने दिली. तसेच, या दोघांना तीन महिन्याचा एक मुलगा असून अयाजला पत्नी रेश्माच्या चारित्र्यावर संशय घेत होता, असे पोलिसांनी सांगितले.
आणखी बातम्या...
सावधान! चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट
बँक ऑफ महाराष्ट्रची कॉर्पोरेट, कृषी कर्जाची डोकेदुखी कायम..
साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटींचा निधी द्या; बीडकरांची मागणी
मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका