प्रेमात अडसर ठरणाऱ्या भावाची प्रियकराच्या मदतीने हत्या, ‘दृश्यम’ पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:02 IST2022-12-12T16:01:45+5:302022-12-12T16:02:57+5:30
Crime News: बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

प्रेमात अडसर ठरणाऱ्या भावाची प्रियकराच्या मदतीने हत्या, ‘दृश्यम’ पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावली
Crime News: राजस्थानच्या चित्तोडगडमधील गांगरारमध्ये पाच दिवसांपूर्वी विहिरीत सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मृताच्या बहिणीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून भावाची हत्या केली. मृतक बहिणीच्या प्रेमविवाहात अडथळा ठरत असल्यानेच बहिणीने टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे आरोपींनी 'दृश्यम' चित्रपट पाहून पुरावे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता पोलिसांनी मृताच्या बहिणीसह तीन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगिले की, 5 डिसेंबर रोजी गांगरार येथील विहिरीत 24 वर्षीय महेंद्रचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे शिर धडापासून वेगळे केले होते. तो मध्य प्रदेशातील मंदसौरचा रहिवासी होता आणि चित्तोडगडमधील गंगरार शहरात त्याच्या आजोबांच्या घरी आई आणि दोन बहिणींसोबत राहत होता. महेंद्रच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि महेंद्र याच्या विरोधात होता.
यानंतर महेंद्रची बहिण तनिष्का रायकाच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकरासह इतर आरोपींनी महेंद्रची हत्या केली आणि मृतदेह विहिरित फेकून दिला. आरोपी महावीर धोबी याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, अजय देवगणच्या 'दृश्यम' चित्रपटाचा पहिला भाग त्यांनी अनेकवेळा पाहिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आयडिया शोधून काढली. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.