शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

निवडणुकीत फ्रॉड करणं पडलं चांगलंच भारी; 'या' भाजपा आमदाराला घडली तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 08:36 IST

BJP Amritlal Meena News : आमदाराचा जामीन अर्ज फेटाळला असून कोर्टाने तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - निवडणुकीत फ्रॉड करणं एका भाजपा नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. राजस्थानच्या सलूंबरचे आमदार अमृतलाल मीणा (BJP Amritlal Meena) यांनी बनावट मार्कशीट दाखल करुन पत्नीला पंचायत निवडणुकीत उभं केल्याच्या धक्कादायक प्रकार आता समोर आला होता. या आरोपाखाली भाजपा नेत्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार अमृतलाल मीणा यांनी पत्नीची खोटी मार्कशीट देऊन पंचायत निवडणुकीचा अर्ज भरला होता. पत्नीची बनावट मार्कशीट दाखवून निवडणुकीचा अर्ज भरल्या प्रकरणात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे या प्रकरणात आमदाराचा जामीन अर्ज फेटाळला असून कोर्टाने तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमृतलाल मीणा यांना कोर्टाने तीन आठवड्यांपूर्वी सरेंडर करण्यास सांगितलं होतं. मीणा यांनी शनिवारी आरोग्याचं कारण देत कोर्टाकडून वेळ मागितली आणि नंतर ते कोर्टासमोर हजर झाले. येथे सुनावणीदरम्यान कोर्टाने अमृतलाल मीणा यांची जामीन याचिका फेटाळली आणि त्यांना तुरुंगात पाठवलं. सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2015 मध्ये मीणा यांच्या पत्नी शांतादेवी यांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती. 

शांता देवीने या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सुगना देवीचा पराभव केला. मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतर सरपंच झालेल्या शांता देवी यांच्यावर बनावट मार्कशीटवर निवडणूक लढविल्याचा आरोप झाला आहे. शांता देवी यांच्या मार्कशीटचा तपास करण्यात आला, ज्यात ते प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिसून आलं. या मार्कशीटवर अभिभावक म्हणून शांता देवीचे पती आमदार अमृतलाल मीणा यांचे हस्ताक्षर आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजपा आमदार अमृतलाल मीणा यांना आरोपी ठरविण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

पंजाबमधील भाजपाचे नेते भूपेश अग्रवाल (BJP Bhupesh Aggarwal) आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर शेतकरी आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे आहे. अग्रवाल यांच्यावर पटियाला जिल्ह्यातील राजापुरा येथे शेतकरी आंदोलकांनी हल्ला केला आहे. अग्रवाल हे पंजाबच्या पटियालामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी आंदोलक कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले आणि त्यांनी भाजपा नेता आणि कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यास तसेच लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी वेळीच यामध्ये हस्तक्षेप केल्याने भाजपा नेत्याला या हल्ल्यापासून वाचवण्यात यश आले आहे. मात्र भूपेश अग्रवाल यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. "500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ" असा दावा भाजपा नेत्याने केला आहे. भूपेश अग्रवाल यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकRajasthanराजस्थानjailतुरुंगCourtन्यायालय