पतीने आवडीचा शर्ट शिवला नाही म्हणून रागावली पत्नी, गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 13:20 IST2021-10-21T13:12:03+5:302021-10-21T13:20:32+5:30
अर्ध्या तासाने शेजाऱ्यांनी फोन केला की, तुझ्या पत्नी गळफास घेऊन आत्महत्या केली. हे ऐकून पतीच्या पायाखालची जमिनच सरकली.

पतीने आवडीचा शर्ट शिवला नाही म्हणून रागावली पत्नी, गळफास घेऊन केली आत्महत्या
राजस्थानच्या कोटा शहरात एका पत्नीने पतीने तिच्या आवडीचं शर्ट शिवून घेतलं नाही म्हणून नाराज होऊन आपला जीव दिला. शर्ट शिवण्याच्या छोट्याशा गोष्टीवरून पती-पत्नी एकमेकांवर नाराज झाले होते. पती रोजप्रमाणे आपल्या कामावर गेला. अर्ध्या तासाने शेजाऱ्यांनी फोन केला की, तुझ्या पत्नी गळफास घेऊन आत्महत्या केली. हे ऐकून पतीच्या पायाखालची जमिनच सरकली. घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आंवली-रोजडी भागात राहणार्या अंजली सुमनने अशाप्रकारे आत्महत्या केली की, या घटनेने संपूर्ण शहराला धक्का बसला. अखेर पतीने पत्नीच्या आवडीचं शर्ट शिवलं नाही या शुल्लक कारणावरून ती कसं आपलं जीवन संपवू शकते? असा प्रश्न लोकांना पडला आहे. पतीचं नाव शुभम आहे जो मध्य प्रदेशच्या मंदसोरचा राहणारा आहे. २३ वर्षीय अंजलीसोबत त्याचं दोन वर्षाआधी लग्न झालं होतं. शुभम प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो.
घटनेच्या दिवशी सकाळी शर्टवरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे शुभम जेवण न करताच आपल्या कामावर निघून गेला होता. तेच पत्नीने शुभमला ऑफिसला गेल्यावर फोनही केला होता. शुभमने सायंकाळी घरी आल्यावर बोलतो असं सांगितलं. पण अर्ध्या तासानंतर शेजाऱ्यांनी शुभमला सांगितलं की, सुमनने गळफास लावून घेतला आहे. आता अंजली सुमनच्या घरच्या लोकांनी शुभम विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस चौकशी करत आहेत.