राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:23 IST2025-06-09T17:22:48+5:302025-06-09T17:23:21+5:30

...राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र, सोनम बेपत्ताच होती. पण आता खुद्द सोनमलाच त्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे.

Raja Raghuvanshi's postmortem report revealed, where were the injuries found on the body | राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याप्रकरण सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. हनिमूनसाठी मेघालयात गेलेले इंदूरचे राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम बेपत्ता झाले होते. यानंतर, राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र, सोनम बेपत्ताच होती. पण आता खुद्द सोनमलाच त्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. यात त्याच्यावर दोन वेळा झाल्लाचे समोर आले आहे. एकदा त्याच्या पाठीत वार केला गेला. यानंतर त्याच्या छातीत वार केला गेला. याच हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. 

एनडीटीव्हीने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. राजा रघुवंशी हत्याकांडातील संशयित आरोपी सोनम रघुवंशी सध्या गाझीपूर पोलीस ठाण्याच्या  कस्टडीत आहे.

काय म्हणाले गाझीपूरचे एसपी? -
गाझीपूरचे एसपी डॉ. इराज राजा म्हणाले, आज (9 जून) सकाळी मध्य प्रदेशपोलिसांकडून, एक सोनम नावाची महिला गोरखपूर हायवेवरील काशी ढाब्यावर आहे, अशी सूचना मिळाली होती. ही सूचना मिळताच पोलिसांचा चमू घटना स्थळी दाखल झाला. त्यांना तेथे सोनम आढळून आली. यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. आतापर्यंत काय कारवाई झाली? -
या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने राज कुशवाह नावाच्या व्यक्तीसोबत मिळून राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला. माध्यमांतील वृत्तांनुसार, राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात काम करत होता. तेथूनच या दोघांची कथित प्रेम कहाणी सुरू झाली.

सोनमचा दावा... -
न्यूज१८ ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आपण आरोपी नसून, या प्रकरणातील पीडित आहोत. अपहरण केल्यानंतर आपल्याला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे सोडण्यात आले होते. यानंतर आपण तेथून आपल्या भावाला फोन केला, असा दावा सोनमने केला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या फोन कॉलसंदर्भात, कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. यानंतर, पोलिसांनी सोनमला अटक केली.

Web Title: Raja Raghuvanshi's postmortem report revealed, where were the injuries found on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.