शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "सोनम खूप घाबरलेली...", राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवी एन्ट्री; कोण आहे उजाला यादव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:04 IST

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान आता गाझीपूरच्या सैदपूर येथील रहिवासी उजाला यादवची यामध्ये एन्ट्री झाली आहे.

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान आता गाझीपूरच्या सैदपूर येथील रहिवासी उजाला यादवची यामध्ये एन्ट्री झाली आहे. UPTAK शी साधलेल्या संवादात उजालाने सांगितलं की, ती ८ जूनच्या रात्री सोनम रघुवंशीसोबत वाराणसी रोडवेज प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून गाझीपूरच्या सैदपूरला जात होती. सोनम रघुवंशीशी भेट झाली आणि तिला गाझीपूरला नाही तर गोरखपूरला जायचं होतं.

८ जून रोजी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत सोनम तिच्यासोबत गाझीपूरच्या सैदपूरच्या पुढे रोडवेज बसमध्ये गेली. त्यानंतर उजाला तिच्या गावासमोरील मुख्य रस्त्यावर उतरली. सोनम बसने पुढे गेली. यानंतर सोनम नंदगंज पोलीस स्टेशनजवळील काशी ढाब्यावर पोहोचली. सकाळी टीव्ही आणि मोबाईलवर बातम्यांमध्ये तिने तिला पाहिलं तेव्हा तिने ओळखलं की ती काल रात्रीची तीच मुलगी आहे. सोनमने तिचा फोनही मागितला होता पण नंबर टाइप केल्यानंतर तिने तो डिलीट केला आणि फोन केला नाही. ती थोडी काळजीत दिसत होती.

सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

उजाला यादव म्हणाली की, सोनम रघुवंशी वारंवार विचारत होती की गोरखपूर किती दूर आहे. ती खूप घाबरली होती. त्यानंतर उजाला यादवने नंदगंज पोलीस स्टेशनच्या पोलिसांना फोन करून सांगितलं की, तिने सोनम रघुवंशीला दोन मुलांसोबत पाहिलं आहे. सकाळी टीव्ही आणि सोशल मीडियावरील बातम्यांमध्ये सोनम रघुवंशीचा फोटो पाहिल्यावर तिने सोनमला ओळखलं.

"मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

"सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...

मेघालय पोलीस उजाला यादवच्या संपर्कात आहेत आणि माहिती घेत आहेत. मात्र उजालाने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. पोलीस याता अधिक तपास करत आहेत. शिलाँगमध्ये हनिमूनला गेल्यावर राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजाची पत्नी सोनमसह आणखी लोकांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक