Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:17 IST2025-07-21T17:16:52+5:302025-07-21T17:17:31+5:30

Sonam Raghuvanshi : हनिमूनदरम्यान पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचणारी सोनम रघुवंशी सध्या जेलमध्ये आहे.

Raja Raghuvanshi honeymoon murder accused Sonam Raghuvanshi spent one month in jail | Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?

Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?

शिलाँगमध्ये हनिमूनदरम्यान पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचणारी सोनम रघुवंशी सध्या जेलमध्ये आहे. सोनमने लग्नानंतर बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आणि यानंतर काही दिवस ती बेपत्ता होती. यानंतर सोनमनेच हत्या केल्याच समोर येताच तिला अटक करण्यात आली. पतीच्या हत्येची मास्टरमाईंड जेलमध्ये कशी आहे, जेलमध्ये ती काय करते?, जेलमध्ये तिला भेटायला कोणी येतं का, तिला तिच्या कृत्याचा पश्चात्ताप होतो का? याबाबत आता माहिती समोर आली आहे. 

सोनम रघुवंशी २१ जूनपासून जेलमध्ये आहे, जेलमध्ये आता तिला एक महिना पूर्ण झाला आहे. एनडीटीव्हीला सूत्रांकडून सोनमशी संबंधित काही माहिती मिळाली आहे. गेल्या एका महिन्यापासून जेलमध्ये सोनमला भेटायला कोणीही आलेलं नाही, तिचा भाऊ, वडील, आई किंवा कोणीही ओळखीची व्यक्ती आलेली नाही. पण सोनमला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही, ती तिच्या कुटुंबातील सदस्यांची आठवणही काढत नाही. राजा रघुवंशीच्या हत्येबद्दल तिला अजिबात पश्चात्ताप नाही, ती जेलमध्ये कोणाशीही याबद्दल बोलत नाही.

राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा

कोणताही पश्चात्ताप नाही

सोनमला जेलमध्ये इतर महिला कैद्यांसोबत ठेवण्यात आलं आहे आणि ती त्यांच्यात चांगली मिसळली आहे. तिला तिच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्तापही नाही, कारण या १ महिन्यात तिने जेल प्रशासन किंवा कोणासमोरही असा कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. ती इतर महिला कैद्यांशी किंवा जेल प्रशासनाशी तिच्या केसबद्दल किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाही. तिने स्वतःला जेलच्या वातावरणाशी जुळवून घेतलं आहे. जेलमधील वातावरण तिच्यासाठी आरामदायक होत चाललं आहे. सध्या तिला जेलमध्ये कोणतंही विशेष काम देण्यात आलेलं नाही, कारण ती अजूनही अंडरट्रायल कैदी आहे. इतर महिला कैद्यांप्रमाणे सोनम दररोज सकाळी वेळेवर उठते आणि जेलच्या नियमावलीचं पालन करते.

२४ तास सीसीटीव्ही देखरेखीखाली 

जेलमध्ये एकूण ४९६ कैदी आहेत, त्यापैकी सोनम  २० वी महिला कैदी आहे. सोनमला जेल वॉर्डनच्या कार्यालयाजवळील जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिच्यासोबत दोन महिला कैदी आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सोनमवर २४ तास लक्ष ठेवलं जात आहे.

सोनमला टीव्ही पाहण्याची परवानगी 

सोनमला टीव्ही पाहण्याची सुविधा आहे आणि जेलच्या नियमांनुसार, तिला तिच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची आणि बोलण्याची सुविधा आहे परंतु कोणीही तिला भेटायला आलेलं नाही किंवा कोणीही तिच्याशी फोनवर बोललेलं नाही. तिला जेलमधील इतर महिला कैद्यांसोबत शिवणकाम आणि इतर कौशल्य विकासाशी संबंधित काम शिकवलं जाईल.

Web Title: Raja Raghuvanshi honeymoon murder accused Sonam Raghuvanshi spent one month in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.