Raj Kundra: शर्लिन चोपडा अन् पूनम पांडेसोबत राज कुंद्रानं केलेला करार; इतक्या नफ्याची झालेली डील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:08 PM2021-07-21T13:08:53+5:302021-07-21T13:14:58+5:30

Raj Kundra Arrest: अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि मॉडेल पूनम पांडे यांचंही राज कुंद्रासोबत कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. 

raj kundra connection with sherlyn chopra and poonam pandey | Raj Kundra: शर्लिन चोपडा अन् पूनम पांडेसोबत राज कुंद्रानं केलेला करार; इतक्या नफ्याची झालेली डील

Raj Kundra: शर्लिन चोपडा अन् पूनम पांडेसोबत राज कुंद्रानं केलेला करार; इतक्या नफ्याची झालेली डील

Next

Raj Kundra Arrest: पोर्नोग्राफिक कंटेंट प्रकरणी अभिनेत्री शिल्ला शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर विविध खुलासे आता होऊ लागले आहेत. राज कुंद्राविरोधात सबळ पुरावे आढळल्यानंतर पोलिसांनी अटक केली आणि कोर्टानं २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अश्लिल सिनेमे तयार करु ते अ‍ॅपच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा आरोप राज कुंद्रावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाशी निगडीत आता नवनवे कनेक्शन्स समोर येऊ लागले आहेत. यात अभिनेत्री शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) यांचंही राज कुंद्रासोबत कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. 

शर्लिन चोपडाला अटकेपासून अंतरिम दिलासा, २२ फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

महाराष्ट्र सायबर सेलमधील सुत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि मॉडेल पूनम पांडे यांचंही नाव आरोपी म्हणून समोर आलं होतं. या दोघांचाही जबाब महाराष्ट्र सायबर सेलनं नोंदवून घेतला आहे. दोघिंनीही राज कुंद्राविरोधात आरोप केल्याचीही माहिती समोर आली आहे. राज कुंद्राला गेल्या वर्षी याप्रकरणात कोर्टाकडून अंतरिम जामीन देखील मिळाला होता आणि जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. 

खुलासा! सचिन वाझेमुळं शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अटक ५ महिने टळली; काय आहे कनेक्शन?

शर्लिननं राज कुंद्रासोबत केला होता करार
सुत्रांच्या माहितीनुसार शर्लिन चोपडा हिनं राज कुंद्राची मालकी असलेल्या आर्म्सप्राइम मीडियासोबत करार केला होता. भारताबाहेरील कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील कंटेंट उपलब्ध करुन देण्यासाठीचा करार करण्यात आला होता. शर्लिन चोपडा सेमी पोर्नोग्राफिकच्या आधारावर एक अ‍ॅप चालवत होती. हे पार्टटाइम काम काही चांगलं चालत नव्हतं त्यामुळे तिनं राज कुंद्राशी संपर्क केला होता. राज कुंद्रासोबत करार करुन ५० टक्के नफ्याच्या वाट्यावर दोघांमध्ये करार झाला होता. राज कुंद्रानं स्वत: या करारावर स्वाक्षरी केली होती. 

देवा याला तुरूंगातच सडू दे...! राज कुंद्राने मलाही ऑफर दिली होती, युट्यूबरचा ‘शॉकिंग’ दावा

जून २०१९ आणि जुलै २०२० दरम्यान दोघांनी खूप चांगली कमाई केली. पण करारानुसार पैसे आपल्याला मिळत नसल्याचं शर्मिल चोपडा हिला लक्षात आलं आणि तिनं एका वर्षानंतर करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. शर्लिन हिनं त्यानंतर पुन्हा एकदा स्वत:चं अ‍ॅप तयार केलं आणि काही महिने त्यातून चांगले पैसेही कमावले. पण ऑगस्ट २०२० मध्ये तिनं अपलोड केलेल्या कंटेंटवर पायरेडेटचा ठपका बसला आणि त्यानंतर तिनं स्वत: एक तक्रार दाखल केली. फेब्रुवारी २०२१ नंतर शर्लिन हिनं दिलेल्या जबाबात तिनं राज कुंद्रा यानं आपल्याला पूर्णपणे पोर्न इंडस्ट्रीमध्ये ढकललं असा आरोप केला आहे. 

दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीलाच राज कुंद्रा यांनी कंपनीचे शेअर्स विकून टाकल्याचा दावा केला होता. यासोबतच याचे सारे कागदपत्रं पोलिसांकडे सुपूर्त केल्याचंही म्हटलं होतं. 

Web Title: raj kundra connection with sherlyn chopra and poonam pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app