देवा याला तुरूंगातच सडू दे...! राज कुंद्राने मलाही ऑफर दिली होती, युट्यूबरचा ‘शॉकिंग’ दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 10:37 AM2021-07-21T10:37:15+5:302021-07-21T10:39:11+5:30

Raj Kundra Porn Case : आता एक लोकप्रिय युट्यूबर राजच्या विरोधात मैदानात उतरली आहे. राजने आपल्याला अश्लील व्हिडीओत काम करण्यासाठी विचारणा केली होती, असा दावा या युट्यूबरने केला आहे.

raj kundra porn case youtuber puneet kaur alleges raj approached her for vulgar video | देवा याला तुरूंगातच सडू दे...! राज कुंद्राने मलाही ऑफर दिली होती, युट्यूबरचा ‘शॉकिंग’ दावा

देवा याला तुरूंगातच सडू दे...! राज कुंद्राने मलाही ऑफर दिली होती, युट्यूबरचा ‘शॉकिंग’ दावा

Next
ठळक मुद्देपुनीत ही एक प्रसिद्ध युट्यूबवर आहे. ती काही जाहिरातींमध्ये देखील झळकली आहे.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra ) याला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. साहजिकच आता या प्रकरणात एक ना एक नवे खुलासे होताना दिसत आहेत. काही लोक राजला दोषी ठरवत आहेत तर काहींना हा कटकारस्थानाचा भाग असल्याचा संशय आहे. आता एक लोकप्रिय युट्यूबर राजच्या विरोधात मैदानात उतरली आहे. राजने आपल्याला अश्लील व्हिडीओत काम करण्यासाठी विचारणा केली होती, असा दावा या युट्यूबरने केला आहे. पुनीत कौर  (Puneet Kaur) असे या युट्यूबरचे नाव आहे.

पुनीतने इन्स्टास्टोरीवर राजबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ‘माझे व्हिडीओ पाहिल्यानंतर राज कुंद्राने मला हॉटशॉट्सच्या अश्लील व्हिडीओंमध्ये काम करणार का? अशी विचारणा केली होती. त्याचा मॅसेज आला होता. आधी हा स्पॅम मॅसेज आहे, असे मला वाटले होतो. हा माणूस इतका नीच आहे, यावर माझा विश्वास बसेना. देवा, याला तुरूंगातच सडू दे,’ असे पुनीतने तिच्या मॅसेजवर लिहिले आहे.

पुनीत ही एक प्रसिद्ध युट्यूबवर आहे. ती काही जाहिरातींमध्ये देखील झळकली आहे. सोशल मीडियावरील आपल्या ग्मॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे ती चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिला लाखो नेटकरी फॉलो करतात.

सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. काल त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आले. कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याच आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असाही आरोप आहे. राजने त्याचा नातलग प्रदीप बख्शीसोबत मिळून लंडनमध्ये केनरिन नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. या कंपनीचा राज कुंद्रा अध्यक्ष आहे शिवाय बिझनेस पार्टनरही आहे.  

Web Title: raj kundra porn case youtuber puneet kaur alleges raj approached her for vulgar video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app