Raj Kundra: खुलासा! सचिन वाझेमुळं शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अटक ५ महिने टळली; काय आहे कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:18 PM2021-07-21T12:18:58+5:302021-07-21T12:20:47+5:30

एँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे मुंबई क्राईम ब्रान्च(Mumbai Crime Branch)वर अनेक स्तरातून टीका झाली.

Shilpa Shetty husband Raj Kundra arrest averted for 5 months due to Sachin Waze; What is connection? | Raj Kundra: खुलासा! सचिन वाझेमुळं शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अटक ५ महिने टळली; काय आहे कनेक्शन?

Raj Kundra: खुलासा! सचिन वाझेमुळं शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अटक ५ महिने टळली; काय आहे कनेक्शन?

Next
ठळक मुद्देमुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून त्यांच्याजागी हेमंत नगराळे यांना आयुक्तपदाची जबाबदारी दिली.मुंबई पोलीस दलात झालेल्या बदलामुळे साक्षीदार आणि पुरावे असूनही राज कुंद्राच्या अटकेसाठी ५ महिन्याचा कालावधी लागला.राज कुंद्राची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून तो अद्यापही अनेक प्रश्नांना उत्तरं देत नाही.

मुंबई – पॉर्न फिल्म निर्मिती केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला(Raj Kundra) पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) राज कुंद्राला अटक करण्याची तयारी फेब्रुवारी महिन्यातच केली होती. परंतु सचिन वाझे(Sachin Vaze) याच्यामुळे राज कुंद्राची अटक लांबली. याच काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एँटेलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. त्यामुळे पोलिसांचे लक्ष या प्रकरणाकडे लागलं.

एँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे मुंबई क्राईम ब्रान्च(Mumbai Crime Branch)वर अनेक स्तरातून टीका झाली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून त्यांच्याजागी हेमंत नगराळे यांना आयुक्तपदाची जबाबदारी दिली. नवीन आयुक्त आल्यानंतर त्यांनी क्राईम ब्रान्चमधून अनेक अधिकाऱ्यांची बदली केली. राज कुंद्रा प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही बदली झाली.

राज कुंद्राला अटक करण्यासाठी ५ महिने लागले

मुंबई पोलीस दलात झालेल्या बदलामुळे साक्षीदार आणि पुरावे असूनही राज कुंद्राच्या अटकेसाठी ५ महिन्याचा कालावधी लागला. राज कुंद्राला पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली कोर्टात हजर केले. त्यानंतर त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. क्राईम ब्रान्चच्या पथकाने मंगळवारी राज कुंद्राला भायखळा जेलमध्ये पाठवले.

४ फेब्रुवारी रोजी दाखल झाली होती पहिली तक्रार

राज कुंद्राची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून तो अद्यापही अनेक प्रश्नांना उत्तरं देत नाही. भायखळा जेलमध्ये राज कुंद्राची चौकशी केली जात आहे. ४ फेब्रुवारीला या प्रकरणात पहिल्यांदा तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांना कारवाईसाठी इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. लवकरच राज कुंद्राचा बिझनेस मॉडेल पोलिसांसमोर येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा सीक्रेट बिझनेस लपवण्यासाठी आर्थिक व्यवहार कसे केले जात होते. यात कोण-कोण सहभागी आहे याचा खुलासाही उघड होण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध यूट्युबरचाही राज कुंद्रावर निशाणा

काही लोक राज कुंद्राला दोषी ठरवत आहेत तर काहींना हा कटकारस्थानाचा भाग असल्याचा संशय आहे. आता एक लोकप्रिय युट्यूबर राजच्या विरोधात मैदानात उतरली आहे. राजने आपल्याला अश्लील व्हिडीओत काम करण्यासाठी विचारणा केली होती, असा दावा या युट्यूबरने केला आहे. पुनीत कौर  (Puneet Kaur) असे या युट्यूबरचे नाव आहे.

Read in English

Web Title: Shilpa Shetty husband Raj Kundra arrest averted for 5 months due to Sachin Waze; What is connection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.