शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली; 'त्या' विधानामुळे खबरदारीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 3:03 PM

राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांच्याभोवती आता 11 जवानांचं कडं असणार आहे.

ठळक मुद्देआता संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. राज्यसभेत संजय राऊत यांनी केलेल्या या भाषांचे पडसाद देशातच नाही तर पाकिस्तानात देखील उमटले होते.

मुंबई - राज्यसभेत पाकिस्तानविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी कलम ३७० हटवल्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेत कलम ३७० हटविणे म्हणजे एका भस्मासूराचा वध केल्यासारखे असून एका सैतानाला मारण्यासारखे आहे. गेली ७० वर्षांपासून आपला देश एक डाग घेऊन चालत होता. तो डाग आज धुवून निघाला असल्याचे भाषण केले आणि अमित शहांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर राऊत यांच्याविरोधात पाकिस्तानात पोस्टर्स लागले होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याने संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांच्याभोवती आता 11 जवानांचं कडं असणार आहे.

राज्यसभेत संजय राऊत यांनी केलेल्या या भाषांचे पडसाद देशातच नाही तर पाकिस्तानात देखील उमटले होते. पाकिस्तानात राऊत यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राऊत यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. वाय प्रकारात १ किंवा २ कमांडो आणि पोलीस कर्मचार्‍यांसह ११ जवानांचे सुरक्षा कवच असते. दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांचाही (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर - पीएसओ) यामध्ये समावेश होतो.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPoliceपोलिसPakistanपाकिस्तानRajya Sabhaराज्यसभा