घरातील कुंटणखान्यावर छापा; आंटीसह एका दलालास अटक, तीन पीडित महिलांची सुटका
By राजकुमार जोंधळे | Updated: July 15, 2023 21:07 IST2023-07-15T21:06:57+5:302023-07-15T21:07:20+5:30
तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातील कुंटणखान्यावर छापा; आंटीसह एका दलालास अटक, तीन पीडित महिलांची सुटका
लातूर : शहरातील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत एका घरात आंटी आणि तिच्या साथीदाराने आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना बाेलावून सुरू केलेल्या कुंटणखान्यावर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी आंटीसह एका दलालाला अटक करण्यात आली. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एका नगरात आंटी आणि तिचा साथीदार राहत्या घरातच स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरगावाहून महिलांना बाेलावून घेत देहविक्रय व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पाेलिस पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा मारला. यावेळी देहविक्रय करणाऱ्या तीन पीडित महिला आणि व्यवसाय करून घेणारी एक आंटी, एक दलाल आढळून आला. त्यांच्याकडून १४ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुरनं. ५२३ / २०२३ कलम ३७०, ३४ भादंवि तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५९, कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंटीसह दलालास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी सुनील गाेसावी, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी अंकिता कणसे, पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे, शामल देशमुख, सदानंद याेगी, सुधामती वंगे, लता गिरी, चालक बुड्डे यांच्या पथकाने केली.