नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील स्पा वर छापा : तीन परदेशी तरुणीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 20:50 IST2018-10-13T20:45:25+5:302018-10-13T20:50:35+5:30
नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील आरोह स्पा मसाज सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हवेली पोलिसांनी छापा घालून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन परदेशी व एका परप्रांतीय तरुणींची सुटका केली़.

नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील स्पा वर छापा : तीन परदेशी तरुणीची सुटका
पुणे : नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील आरोह स्पा मसाज सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हवेली पोलिसांनी छापा घालून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन परदेशी व एका परप्रांतीय तरुणींची सुटका केली़. मसाज सेंटर मालक व व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. व्यस्थापक टी मावेलझुआ कपतांगा (वय २१, सध्या रा़ नांदेड सिटी, मुळ- मिझोराम) याला अटक करण्यात आली आहे़.
नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉल येथील आरोह स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी यांना मिळाली़. पोलिसांनी आरोह स्पा मसाज सेंटर येथे बनावट ग्राहक पाठविला़. तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी छापा टाकला़. तेथील चार तरुणींची सुटका केली़. त्यात तिघी थायलंडमधील आहेत़. मसाज सेंटरचे माल शरद नामदेव जाधव (रा़ नांदेड सिटी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
कपतांगा याला शनिवारी न्यायालयात हजर केले़. त्याने या चार महिलांना कोठून आणले, त्यांचे इतर साथीदार कोण याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले़. न्यायालयाने अधिक तपासासाठी १५ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़.
या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, निलेश कदम, उपनिरीक्षक राहुल वरोटे, शेंडगे, बाबर, देसाई, महिला पोलीस कोलते यांनी भाग घेतला होता़.