उल्हासनगरात हुक्का पार्लरवर धाड, ६ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 16:26 IST2020-10-12T16:15:17+5:302020-10-12T16:26:01+5:30
Police Raid : शहरात तीन पत्ते जुगार, हुक्का पार्लर, झटपट लॉटरी आदींचा सुळसुळाट झाल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगरात हुक्का पार्लरवर धाड, ६ जणांवर गुन्हा
उल्हासनगर : सी ब्लॉक, डी टी कलानी कॉलेज परिसरातील स्मोक हाउस हुक्का पार्लरवर उल्हासनगरपोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकून ६ जणांना अटक केली. शहरात तीन पत्ते जुगार, हुक्का पार्लर, झटपट लॉटरी आदींचा सुळसुळाट झाल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर सी ब्लॉक रस्ता डी टी कलानी कॉलेज परिसरात स्मोक हाउस नावाचे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली. मोहित खानचंदानी, राज वाल्मिकी, गणेश पवार, अमर सोनार,. राज कानोजिया व दिलीप आहुजा असा ६ जणांना पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. शहरातील विविध चौकात, मुख्य बाजारपेठ परिसरात हुक्का पार्लर, ऑन लाईन झटपट लॉटरी, तीन पत्ते जुगार अड्डे असून पोलिसांनी यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही शहरातून होत आहे.