हुक्का पार्लरवर धाड;  पोलीस उपायुक्तांच्या पथकाने १८ जणांना पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 20:26 IST2021-03-04T20:25:53+5:302021-03-04T20:26:34+5:30

Raid on hookah parlor : या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raid on hookah parlor; A team of Deputy Commissioners of Police arrested 18 people | हुक्का पार्लरवर धाड;  पोलीस उपायुक्तांच्या पथकाने १८ जणांना पकडले 

हुक्का पार्लरवर धाड;  पोलीस उपायुक्तांच्या पथकाने १८ जणांना पकडले 

ठळक मुद्दे काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून हुक्का पार्लर वर धाड टाकली .

मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शितलनगर भागात बेधडक चालणाऱ्या शिशा लाऊंज ह्या हुक्का पार्लरवर परिमंडळ १ च्या उपायुक्तांच्या पथकाने धाड टाकून १८ जणांना पकडले आहे. या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोडच्या शीतल नगर मधील  रश्मीपार्क ए-२ हौसिंग सोसायटीच्या ९ ते १६ क्रमांकांच्या गाळ्यां मध्ये शिशा लाऊंज ह्या नावाने हुक्का पार्लर चालवले जात आहे . हर्बलच्या नावाखाली तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन चालत असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांना मिळाली.

काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून हुक्का पार्लर वर धाड टाकली . सदर धाडीत  हुक्का पार्लर मालक नोमान सय्यद (२६), व्यवस्थापक नरेश म्हात्रे  (४२), वेटर अनम उद्दीन (२४), इमरान मंडल (२५), अभिषेक पटेल (३२), फिरोज नसिरुद्दीन, इस्मानगनी भरभुय्या सह ग्राहक विजयसिंह राजपूत, अमित कोहली, सरफराज अली, उदीतकुमार गुप्ता, आनंद पांडेवय, धर्मेश मकवाना, नागिस जवेरी, मितेशकुमार सिंह, शहीद शेख, काजल अरुण वेरी, मुस्कान असिफअली वारसी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . त्यांच्यावर विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  घटनास्थळावरून  २० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Web Title: Raid on hookah parlor; A team of Deputy Commissioners of Police arrested 18 people