Crime News : उल्हासनगरातील चांदणी बारवर धाड, बारबालांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 06:07 PM2021-10-10T18:07:30+5:302021-10-10T18:08:35+5:30

Crime News : शनिवारी रात्री साडे नऊ वाजता गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदणी बारवर पथकाने धाड टाकली. 

Raid on Chandni Bar, case filed against 40 people including bar girls in Ulhasnagar | Crime News : उल्हासनगरातील चांदणी बारवर धाड, बारबालांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

Crime News : उल्हासनगरातील चांदणी बारवर धाड, बारबालांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : १७ सेक्शन परिसरातील वादग्रस्त चांदणी बारवर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी रात्री ९ वाजता धाड टाकून ग्राहकांसोबत अश्लील चाळे करणाऱ्या बारबालांसह एकून ४० जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे. (Raid on Chandni Bar, case filed against 40 people including bar girls in Ulhasnagar)

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील १७ सेक्शन चौक परिसरात चांदणी बार असून बारमध्ये युट्यूबमधील गाण्यावर बारबालांचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री साडे नऊ वाजता गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदणी बारवर पथकाने धाड टाकली. 

यावेळी बारबाला युट्युब गाण्यावर ग्राहकांसोबत अश्लील चाळे करून नाचत होत्या. पोलीस पथकाने १७ बारबाला, बार व्यवस्थापक मनोज पात्रा यांच्यासह वेटर, कर्मचारी व १० ग्राहक असे एकून ४० जणांना अटक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहे. 

शहरातील एका दुकानातून दोन दिवसांपूर्वी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल ५४ लाखांची वैधानिक इशारा नसलेली विदेशी सिगारेटची पॉकेट बॉक्स जप्त केली. शहराबाहेरील पोलीस हे स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करीत आहेत. तसेच शहरातील अनेक लॉजिग-बोर्डिंगवर अवैध धंदे फोपावल्याची चर्चा होऊन कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Raid on Chandni Bar, case filed against 40 people including bar girls in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.