Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 08:30 IST2025-07-12T08:29:04+5:302025-07-12T08:30:42+5:30

Radhika Yadav : राधिकाने कोचसोबत केलेल्या WhatsApp चॅटवरून ही माहिती समोर आली आहे. राधिकाच्या वडिलांनी तिला मारल्याचं कबूल केलं आहे.

Radhika Yadav wanted to go abroad for few months whatsapp chat her coach surfaced | Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

गुरुग्राममध्ये वडिलांनी गोळ्या घालून हत्या केलेली टेनिसपटू राधिका यादव परदेशात जाण्याचा विचार करत होती, कारण तिला वाटत होतं की, तिला इथे खूप बंधनांमध्ये राहावं  लागत आहे. राधिकाने तिच्या कोचसोबत केलेल्या WhatsApp चॅटवरून ही माहिती समोर आली आहे. राधिकाच्या वडिलांनी तिला मारल्याचं कबूल केलं आहे.

चॅटमध्ये राधिका तिच्या कोचला सांगते, "इथे खूप बंधनं आहेत, मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे." तिच्या कोचशी झालेल्या चॅटमध्ये तिने तिच्या कुटुंबापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, कारण तिला जीवनाचा आनंद घ्यायचा होता. राधिकाने परदेशात जाण्याबद्दलही चर्चा केली होती. दुबई किंवा ऑस्ट्रेलिया याबाबत ती बोलली होती. तर चीनमध्ये जेवणाचे पर्याय कमी असल्याने तिने तिथे जाण्यास नकार दिला.

 म्युझिक व्हिडीओमुळे संतापले वडील, टेनिस अकॅडमीलाही विरोध; राधिका हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

राधिकाचे वडील दीपक यादव यांनी त्यांच्या मुलीची टेनिस अकॅडमीवरून वारंवार होणाऱ्या वादांमुळे हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तसेच राधिकाच्या सोशल मीडियावरील रील्सबद्दल गावकऱ्यांनी केलेल्या टोमण्यांमुळे ते नाराज होते. राधिकाचा एक म्युझिक व्हिडिओही समोर आला आहे. यामुळे वडील खूप संतापले होते. त्यांनी तिला अकॅडमी देखील बंद करण्यास सांगितली होती. 

राधिकाच्या करियरवर अडीच कोटींचा खर्च, अकाऊंट डिलीट; वडिलांच्या थ्येरीवर पोलिसांना संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गावकऱ्यांच्या टोमण्यांमुळे हत्या केल्याचं कारण सांगितलं आहे. मात्र पोलिसांना या प्रकरणात वेगळाच संशय आहे.  तपासात दीपक यादव यांचे वार्षिक उत्पन्न लाखोंमध्ये असल्याचं उघड झालं आहे. ते ब्रोकर व्यवसायातून दरवर्षी १५ लाख रुपये कमवत असे आणि भाड्यातून दरमहा ५ ते १० लाख रुपये कमवत असे. गावातील काही लोकांनी दीपक यांना म्हटलं होतं की, त्याची मुलगी तिच्या मनाप्रमाणे काम करते आणि तो एक चांगला बाप नाही. यानंतर दीपक यांनी राधिकाला तिची टेनिस अकॅडमी बंद करण्यास अनेक वेळा सांगितलं, परंतु राधिकाने नकार दिला.

Web Title: Radhika Yadav wanted to go abroad for few months whatsapp chat her coach surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.