हिंगोलीत बनावट नोटा तयार करण्याचे रॅकेट; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 02:40 IST2020-09-04T02:39:49+5:302020-09-04T02:40:11+5:30

. संतोष जगदेवराव सूर्यवंशी (देशमुख) व छायाबाई गुलाबराव भुक्तार यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना गुरुवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Racket for making counterfeit notes in Hingoli; Both arrested | हिंगोलीत बनावट नोटा तयार करण्याचे रॅकेट; दोघांना अटक

हिंगोलीत बनावट नोटा तयार करण्याचे रॅकेट; दोघांना अटक

हिंगोली : ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आनंद नगर येथे भाड्याने घेतलेल्या घरातील एका खोलीत पोलिसांनी छापा टाकून १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या बनावट नोटांसह एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संतोष जगदेवराव सूर्यवंशी (देशमुख) व छायाबाई गुलाबराव भुक्तार यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना गुरुवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अरूण हनवते यांच्या घरातील भाडेकरु बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणत आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले.

Web Title: Racket for making counterfeit notes in Hingoli; Both arrested