पती पत्नीच्या भांडणात मुलाने घेतला वृद्ध आईचा जीव; गोळीबार करून झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 16:06 IST2021-09-02T16:03:19+5:302021-09-02T16:06:52+5:30

Firing Case : 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता मुंडका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना रोशनी नावाच्या वृद्ध महिलेवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली.

In the quarrel between husband and wife, the son took the life of the old mother; He escaped by firing | पती पत्नीच्या भांडणात मुलाने घेतला वृद्ध आईचा जीव; गोळीबार करून झाला फरार

पती पत्नीच्या भांडणात मुलाने घेतला वृद्ध आईचा जीव; गोळीबार करून झाला फरार

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिचा ३५ वर्षीय मुलगा संदीपने गोळ्या घातल्या. घटना घडल्यानंतर संदीप फरार आहे.

दिल्लीच्या रोहिणीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलाने स्वतःच्या आईला गोळ्या घातल्या. आईची प्रकृती चिंताजनक आहे. असे सांगितले जात आहे की, आरोपी संदीपचे गेल्या ५ वर्षांपासून त्याच्या पत्नीशी भांडण सुरू होते. संदीपची पत्नी सासू आणि सासऱ्यांसोबत राहत होती.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता मुंडका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना रोशनी नावाच्या वृद्ध महिलेवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली. तिला बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला.
 
मुलगा गोळीबारानंतर फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिचा ३५ वर्षीय मुलगा संदीपने गोळ्या घातल्या. घटना घडल्यानंतर संदीप फरार आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी सांगितले क, संदीपचा पत्नी रितूसोबत वाद सुरू होता. तर पत्नी संदीपच्या आई आणि वडिलांसोबत आपल्या 5 वर्षांच्या मुलीसह रोहिणी येथे राहत होती.

घटनेच्या दिवशी पती रात्री ९ वाजता अचानक घरी पोहोचला. यानंतर संदीप काही गोष्टींवरून भांडायला लागला. या दरम्यान, भांडण इतके विकोपाला गेले की संदीपने त्याच्या आईला गोळ्या घातल्या. त्यानंतर संदीप फरार आहे. पोलीस तपासात व्यस्त आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या प्रकरणी आरोपी मुलाचा शोध सुरू आहे.

 

Web Title: In the quarrel between husband and wife, the son took the life of the old mother; He escaped by firing