शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

शहरातील वाहनचोरांवर कारवाई करण्यात पुणे पोलीस ठरले ‘उणे ’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:42 PM

२०१७ मध्ये शहरातून एकुण मिळून २२१२ वाहने चोरीला गेली होती. २०१८ मध्ये एकुण मिळून १९६६ वाहने चोरीला गेली आहेत.

ठळक मुद्देमागील वर्षी 1757 दुचाकी चोरीला :  गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी : डॉ. के. वेंकटेशम

पुणे : शहरात शांतता सुव्यवस्था ठेवावी याकरिता पोलीस प्रशासनाने डिजिटालाईज होण्याचा निर्धार केला असताना दुस-या बाजुला अद्याप वाहतूक विभागाला वाहन चोरीला आळा घालण्यात अपयश आले आहे. दिवसाला सरासरी सहा ते सात वाहनांची चोरी होत असून गेल्या वर्षी शहर परिसरातून 1757 दुचाकी चोरीला गेली. तर 59 तीन चाकी आणि 150 चारचाकी वाहनांची चोरी झाली आहे. मात्र, हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने ते वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.   २०१७ मध्ये शहरातून एकुण मिळून २२१२ वाहने चोरीला गेली होती. २०१८ मध्ये एकुण मिळून १९६६ वाहने चोरीला गेली आहेत. वाहन चोरीचे गुन्हे कमी झाले असले तरी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण केवळ २९ टक्के एवढे आहे. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेतील सर्व पथके तसेच पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.  वाहनचोरीचे  गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याची कबुली  डॉ. के. वेंकटेशम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. वाहन चोरी रोखण्यासाठी ज्या भागातून वाहने चोरीला जातात. अशा  भागांवर पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे  वाहतूक शाखेसाठी सीसीटीव्ही आणी ईचलन डिव्हाई मशीन्सचा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होताना दिसत आहे. याव्दारे वाहतूक शाखेला कोट्यावधी रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल केले आहेत. वाहतूक शाखेने 2018 मध्ये सीसीटीव्हीव्दारे नियमभंग करणा-या 6 लाख 33 हजार 424 जणांवर कारवाई केली . त्यापैकी 87 हजार 637 केसेसमध्ये 1 कोटी 85 लाख 89 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर ई-चलनव्दारे 12 लाख 14 हजार 500 जणांवर कारवाई करुन त्यापैकी 7 लाख 24 हजार 494 जणांकडून 17 कोटी 51 लाख 15 हजार 242 रुपये दंड वसुल करण्यात आला.  * वाहतूक नियमभंग करणा-यांवर सीसीटीव्हीव्दारे करण्यात आलेली कारवाई : वर्ष    केसेसची संख्या  आकारण्यात आलेला दंड   पैकी किती केसेसमधून   आकारण्यात आलेल्या दंडापैकी जमा रक्कम2018  6,33,424           13,79,13,900                   87,637                           1,85,89,700 2017  4,51,478            10,90,32,400                 48,479                             1,10,80,100 

ई-चलन डिव्हाईस चलनव्दारे कारवाई वर्ष     केसेसची संख्या  आकारण्यात आलेला दंड     पैकी किती केसेसमध्ये                      दंडाची जमा रक्कम 2018  12.14.500    32,66,14,397             7,24,494                                       17,51,15,242 2017   8,39,609    21,34,55,028           5,67,344                                          12,70,88,345

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर