बॉयफ्रेन्ड बनवण्याच्या घाईने कंगाल झाली तरूणी, तरूणाने लावला ७३ लाख रूपयांचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 03:34 PM2021-10-15T15:34:07+5:302021-10-15T15:48:59+5:30

टाइम्स नाउमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, पीडित तरूणी पुण्यातील वाकड भागात राहते. यावर्षीच जून महिन्यात डेटींग वेबसाइटवर तरूणीची एका तरूणासोबत ओळख झाली होती.

Pune : Online fraud woman duped by fraudster of seventy three lakh rupees met on dating website | बॉयफ्रेन्ड बनवण्याच्या घाईने कंगाल झाली तरूणी, तरूणाने लावला ७३ लाख रूपयांचा चुना

बॉयफ्रेन्ड बनवण्याच्या घाईने कंगाल झाली तरूणी, तरूणाने लावला ७३ लाख रूपयांचा चुना

Next

ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) कित्येक घटना दररोज समोर येत असतात. पुणे (Pune) शहरातूनही ऑनलाइन फसवणुकीची (Dating Site Fraud) एक धक्कदायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने एका तरूणीला ७३ लाख रूपयांचा चूना लावला. एका डेटींग वेबसाइटवर दोघांची भेट झाली होती. तरूणीने पोलीस स्टेशनमध्ये तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे

टाइम्स नाउमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, पीडित तरूणी पुण्यातील वाकड भागात राहते. यावर्षीच जून महिन्यात डेटींग वेबसाइटवर तरूणीची एका तरूणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी आपसात नंबर शेअर केले आणि मग दोघेही WhatsApp वर चॅटींग करू लागले होते.

काही दिवस दोघे चॅंटींग करत राहिले आणि नंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तरूणाने तरूणीला खोटं सांगितलं की, तो परदेशात राहतो. त्याला लवकरच भारतात येऊन सेटल व्हायचं आहे. तरूणाने तरूणीला असाही विश्वास दिला की, तो तिच्यासोबत लग्न करेल. तरूणीनेही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवला.

नंतर एक दिवस अचानक तरूणाने तरूणीला फोन आणि सांगितलं की,  मी एअरपोर्टवर आहे. कस्टम डिपार्टमेंटने मला पकडलं आहे. माझ्याकडे १ कोटी रूपये आहेत. मी जर दंड नाही भरला तर माझ्या विरोधात केस होईल. 

तरूण तिला म्हणाला की, तू दंड भरण्यासाठी मला लगेच ७३ लाख रूपये पाठव. प्रियकर अडचणीत असल्याचं पाहून तरूणीनेही वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये ७३ लाख रूपये ट्रान्सफर केले आणि तरूणाला विश्वास दिला की, त्याला काही होणार नाही.

तरूणीने ७३ लाख रूपये ट्रान्सफर केल्यावर तरूणाने तरूणीसोबत संपर्क बंद केला. काही वेळाने आपल्यासोबत काय झालं हे तरूणीच्या लक्षात आलं. यानंतर  तरूणीने तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तिने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली.
 

Web Title: Pune : Online fraud woman duped by fraudster of seventy three lakh rupees met on dating website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.