शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 21:22 IST

Pune Crime: कोयत्याने वार करून केला खून, जेजुरीच्या माळशिरसमधील घटना

जेजुरी: पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याचा कोयत्याने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली. आरोपीच्या प्रेयसीशी लग्न केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेत दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर) याचा खून झाला आहे. तर आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस ता. पुरंदर / मूळ रा. राहू ता. दौड जि. पुणे) हा खून करून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फोन, व्हॉट्सअपवर धमक्या

या खुनाबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील मयत दीपक जगताप याचा नुकताच वाघापूर ता. पुरंदर येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मयत दीपक जगताप हा उरुळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करत होता. नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरुळी कांचन येथे राहण्यास गेला. महिनाभर संसार सुरळीत चालू असताना, पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हॉट्सअप कॉल करून, मी पायलशी लग्न करणार होतो, तुम्ही दोघांनी लग्न का केले? असा राग मनात धरून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. याबाबत मयत दीपक ने आपल्या घरातही माहिती दिली होती.

वाद मिटवण्यासाठी भेटला आणि 'खेळ खल्लास' करून टाकला...

शनिवारी, १३ डिसेंबरला, दीपक पायलसह राजेवाडी येथे आला. पायलला घरी सोडून घरी परतत असताना त्याला सुशांत मापारी सतत कॉल करत होता. 'पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा आणि लग्नाचा वाद मिटवून टाक', असे सांगत राहिला. याच बहाण्याने सुशांत दीपकला भेटला. माळशिरस हद्दीतील रामकाठी शिवारात त्याने दीपकला बोलावून घेतले. याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात, मानेवर, पायावर धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर तो कोयता जागेवरच टाकून पसार झाला.

नातेवाईकांनी शोध घेतल्यावर प्रकरण उघडकीस

दीपक जगताप घरी न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी आढळून आल्या. याबाबतची फिर्याद मयत दीपकचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी सासवड उपविभागिय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौड आणि बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पोलिसांनी पथके तयार करून पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील पुढील तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jealous ex-lover murders husband one month after girlfriend's marriage.

Web Summary : In Purandar, a jilted lover murdered his ex-girlfriend's husband, fueled by rage over their marriage. The accused lured the victim, fatally attacking him with a sickle. Police are searching for the absconding suspect.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेSolapurसोलापूर