सिरियल मोलेस्टरला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 14:42 IST2018-09-24T21:44:33+5:302018-09-25T14:42:17+5:30
सिरियल मोलेस्टरला बेड्या ठोकण्यासाठी परिसरात पोलीस जनजागृती करीत असून कोणाला तो दिसल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात त्वरित कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सिरियल मोलेस्टरला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची जनजागृती
पालघर - नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत, नवी मुंबई व ठाण्यात थैमान घातलेल्या विकृत नराधम नालासोपाऱ्यात दाखल झाला आहे. त्याने एका मुलीचा विनयभंग तर दुसरीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या दोन घटनेमुळे पोलिसांची आणि नागरिकांचीही भीतीने झोप उडाली आहे. सिरियल मोलेस्टरला बेड्या ठोकण्यासाठी परिसरात पोलीस जनजागृती करीत असून कोणाला तो दिसल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात त्वरित कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस