वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; छापा टाकून २ मुलींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 19:44 IST2019-11-13T19:43:33+5:302019-11-13T19:44:58+5:30
२ दलालांना अटक

वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; छापा टाकून २ मुलींची सुटका
पणजी - गुन्हा अन्वेषण विभागाकडून कळंगूट येथे वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकून दोन दलालांना ताब्यात घेतले. या ठिकाणी दोन दलाल मुली पुरविण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आणि वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला.
त्यामुळे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण विभागाच पोलिसांनी व्यवस्थित नियोजन करून ही कारवाई केली. बोगस ग्राहक बनवून दलालाशी संपर्क केला व नंतर छापा टाकला. या छाप्यात दोन युवतींची सुटका करण्यात आली. या दोन्हीही मुली महाराष्ट्रातील आहेत. दोघांनाही मेरशी येथील सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांची दलालांची नावे अक्षय सतीश कार्नवाल (२७) आणि तोफिक महम्मद लखीमार अशी आहेत. अक्षय हा उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील आहे तर तोफीक हा कुर्टी फोंडा येथे राहाणारा आहे. या छाप्यात एक स्वीफ्ट कार व एक डिओ स्कूटर, मोबाईल फोन आणि रोखड जप्त करण्यात आल्याची माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
Goa: Crime Branch has busted a prostitution racket in Calangute, 2 pimps arrested, 2 girls rescued
— ANI (@ANI) November 13, 2019