खळबळजनक! स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; महिलेस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 20:32 IST2019-07-10T20:31:05+5:302019-07-10T20:32:51+5:30
मालकाचा शोध सुरु आहे.

खळबळजनक! स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; महिलेस अटक
मीरारोड - स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायप्रकरणी काशिमीरा पोलीसांनी व्यवस्थापक महिलेस अटक केली असून मालकाचा शोध सुरु आहे.
पेणकरपाडयातील अजित पॅलेस हॉटेल गल्लीत डि पॅरेडाईज या नावाने चालवण्यात येणाराया स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक शिंगारे, उपनिरीक्षक चेतन पाटील यांच्यासह राजेश पानसरे, श्रीमंत जेधे, गुळदगडे, सुरडकर यांनी सापळा रचून बनावट गिरहाईक पाठवले.
स्पामधील व्यवस्थापक चित्रा संजय माने, राहणार - जनता बँकेच्या मागे, वसई येथे हिने वेश्याव्यवसायासाठी चार तरुणी उपस्थित केल्या. साडे तीन हजारात एका तरुणीचा सौदा ठरल्यानंतर त्या गिऱ्हाईकाने पोलीसांना मिस कॉल करुन इशारा दिला. दरम्यान, पोलीसांनी छापा टाकून माने हिला अटक केली आणि चार तरुणींची सुटका केली. सदर स्पाचा मालक हनिफ शेख असून पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.